आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन हिल्सवर उद्या प्रवचनासह गुरू गुणगान:आचार्यश्री जयमलजीच्या 315 व्या जन्मोत्सवानिमित्ताने 130 तपस्वींचा सन्मान

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य सम्राट 1008 जयमलजी यांच्या 315 व्या जन्मोत्सवानिमित्त जैन हिल्स येथे 130 तपस्वींचा सामूहिक सन्मान करण्यात आला. तपस्वींचा हा सन्मान कस्तुरचंद बाफना, शंकरलाल कांकरिया, अजय ललवाणी, सुशील बाफना, निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, ममता कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. पद्मचंद्रजी यांनी ‘जैन’ शब्दाची व्याख्या प्रवचनातून सांगितली. या जन्मोत्सवानिमित्त आपली संस्कृती जपण्याचा संकल्प केला पाहिजे. प्रत्येकाने स्वच्छता आणि स्वयंशिस्तीचे आचरण करून आचार्य जयमलजी यांनी दिलेल्या मार्गावर चालावे, असे डॉ. पद्मचंद्र मुनी यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले.

जयमलजी यांच्या 315 व्या जन्मोत्सवानिमित्त आचार्य प्रवर 1008 पार्श्वचंद्र मुनी, डॉ. पद्मचंद्र मुनी, जयेंद्र मुनी, जयशेखर मुनी, जयधुरंधर मुनी, जयकलश मुनी, जयपुरंदर मुनी उपस्थित होते. तपस्वींचा सन्मान श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक, श्री अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.

जन्मोत्सवात यांनी केले गुरूंवर भाष्य

जयधुंरधर मुनी, जैन समणी प्रमुख डॉ. सुयश निधी यांनी देखील उपस्थित श्रावक-श्राविकांना आचार्य जयमलजी यांच्या विचारांवर मोक्ष प्राप्त होतो. आचार्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गस्थ झाले पाहिजे. तसेच तपस्याचे महत्त्व सांगत जीवनातील अंध:कार दूर करण्यासाठी ते महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

उद्या प्रवचन, गुरूगुणगान

गुरुवारी जैन हिल्स येथे डॉ. पद्मचंद्रजी यांचे सकाळी प्रवचन, मंगलाचरण, स्वागत गीत, अतिथी स्वागत, प्रस्तावना व गुरुभक्ती होईल. त्यानंतर सामूहिक तेले तप प्रत्याख्यान होईल. तर दुपारी पावणेबारा वाजता पासून गौतम प्रसादी कार्यक्रम होईल. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संघपती दलीचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...