आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष:पत्रकार संघातर्फे माध्यमातील महिलांचा सन्मान; महिला पत्रकारांचे धाडस हे कौतुकास्पद : महापौर

जळगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्री-बेरात्री माहिती घेण्यासाठी जाण्याचा प्रसंग येणे, पत्रकारितेमधील धोके अशांमुळे मागे असलेल्या महिला पत्रकारितेत पुढे आल्या. आता महिला मोठ्या आवडीने, उत्साहाने घटनास्थळी जाऊन पत्रकारिता करताना दिसत आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या कार्यालयातून मिळणारे प्रोत्साहन देखील महत्त्वाचे आहे. ही जळगावच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

जिल्हा पत्रकार संघातर्फे माध्यम क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा मंगळवारी करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला पत्रकार शांता वाणी ह्या हाेत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भावना शर्मा, लीना पाटील उपस्थित होत्या. प्रास्ताविक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. गोपी सोरडे यांनी केले. या वेळी माध्यम क्षेत्रातील २४ महिला व ३ महिलांचा सत्कार करण्यात आला. यामिनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मनीष पात्रीकर यांनी आभार मानले. या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त अशोक भाटिया, सचिव पांडुरंग महाले, चंदू नेवे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विश्वजीत चौधरी, जितेंद्र कोतवाल, किशोर पाटील, सचिन पाटील, भूषण हंसकर यांचे सहकार्य लाभले.

या महिलांचा झाला सन्मान
शांता वाणी, भावना शर्मा, शुभदा नेवे, सरिता खाचणे, धनश्री बागुल, लीना पाटील, मुनिरा तरवारी, गौरी बारी, वैशाली पाटील, सोनम पाटील, गौरी जोशी, पुष्पा पाटील, सुवर्णा पाटील, सुनीता कोतवाल, प्रा. केतकी सोनार, जयश्री निकम, वर्षा लोहार, कविता ठाकरे, पल्लवी सोनवणे, विमल कोळी, शालिनी कोळी, जागृती भावसार, यामिनी कुलकर्णी, सविता कानडे या माध्यम क्षेत्रातील महिलांचा व पत्रकार पतीचा जीव वाचावा म्हणून स्वतःचे यकृत दान करणाऱ्या शारदा केऱ्हाळे, फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारप्राप्त प्रेमलता पाटील, कमी वयात पुस्तक लिहिणाऱ्या सफिना सैफी यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...