आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:रुग्णालये फुल्ल! रात्री दोन वाजता ऑक्सिजन मिळाल्याने गर्भवती वाचली

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साकेगावच्या महिलेसाठी दिवसभर नातेवाईक ठोठावत होते हॉस्पिटलची दारे

रोज हजाराच्या जवळपास वाढणारे रुग्ण आणि त्यामुळे खासगी रुग्णालयांतील खाटांची संपलेली उपलब्धता यातून परिस्थिती किती गंभीर झाली आहे याचा प्रत्यय रोज असंख्य रुग्णांना येऊ लागला आहे. साकेगाव येथील एका गर्भवती महिलेला शहरातील बहुतेक सर्व खासगी रुग्णालयांनी जागे अभावी दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवल्यानंतर रात्री दोन वाजता जिल्हा रुग्णालयाने अनिच्छेने का असेना दाखल करून घेतल्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत. गुरुवारी भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एक २७ वर्षीय गर्भवती महिलेला ताप होता आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे तिची कोरोना चाचणी करायला सांगण्यात आली. चाचणी केल्यानंतर संसर्ग झाला नसल्याचा अहवाल आला. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले.

दिवसभरात शहरातील किमान १५ ते १६ रुग्णालयात तिला नेण्यात आले. मात्र, जागा उपलब्ध नाही असे काही रुग्णालयांनी सांगितले तर काहींनी कोविड हाॅस्पिटल असल्याने नॉन कोविड रुग्ण दाखल करता येणार नाही, असे काही रुग्णालयांनी सांगितले. या काळात त्या महिलेची परिस्थिती अधिकाधिक बिघडत होती. त्यामुळे अखेर नातेवाइकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. या ठिकाणी देखील डॉक्टर महिलेला दाखल करून घेण्यास तयार नव्हते. शेवटी नातेवाइकांनी विनंती करून आणि थोडा वाद घालून डाॅक्टरांवर उपचारासाठी दडपण आणले. शेवटी स्ट्रेचरवरच तिला आॅक्सिजन लावण्यात आला. पण तिच्यावर कोणताही औषधोपचार केला गेला नाही. अखेर नातलगांनी फारच दडपण आणल्यामुळे रात्री साधारणत: अडीच वाजेच्या सुमारास या महिलेला कॅज्युलिटी विभागात दाखल करून घेण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीनंतर मिळाले उपचार
दरम्यान, केवळ आॅक्सिजन लावला, औषधोपचार केला नाही म्हणून या महिलेच्या नातेवाईकांनी सकाळी जिल्हारुग्णालयात पाहाणीसाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी उपचार करण्याची सूचना संबंधित डाॅक्टरांना केली. त्यानंतर औषधोपचार सुरू झाले, असे नातलगांचे म्हणणे आहे. रात्री डाॅक्टरांनी केसपेपर द्यायला नकार दिला. केस पेपर काढला तर आमच्यावर जबाबदारी येईल, असे डॉक्टर म्हणायचे, असे नातेवाईक म्हणाले. असे काही रुग्णालयांनी सांगितले. या काळात त्या महिलेची परिस्थिती अधिकाधिक बिघडत होती. त्यामुळे अखेर नातेवाइकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. या ठिकाणी देखील डॉक्टर महिलेला दाखल करून घेण्यास तयार नव्हते. शेवटी नातेवाइकांनी विनंती करून आणि थोडा वाद घालून डाॅक्टरांवर उपचारासाठी दडपण आणले. शेवटी स्ट्रेचरवरच तिला आॅक्सिजन लावण्यात आला. पण तिच्यावर कोणताही औषधोपचार केला गेला नाही. अखेर नातलगांनी फारच दडपण आणल्यामुळे रात्री साधारणत: अडीच वाजेच्या सुमारास या महिलेला कॅज्युलिटी विभागात दाखल करून घेण्यात आले.

आयएमएने पुढाकार घ्यावा
जिल्हा रुग्णालय हे गरिबासाठी शेवटचा आधार आहे. तिथेच डाॅक्टर्स उपलब्ध नसल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जळगाव शाखेने पुढाकार घेऊन जिल्हा रुग्णालयासाठी डाॅक्टर्स उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन ‘दिव्य मराठी’ संघटनेला करीत आहे. शहरातील खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या इतर डाॅक्टरांनी रोज केवळ दोन तास जिल्हा रुग्णालयाला द्यायचे ठरवले तरी खूप मोठा ताण कमी होऊ शकेल. आयएमएचे सहकार्य मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही अाता पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही आम्ही या निमित्ताने करीत आहोत. या शिवाय, निवृत्त डाॅक्टर्स, बाहेर गावाहून काही दिवसांसाठी इथे आलेले डाॅक्टर्स, नर्सेस यांनीही मदतीचा हात पुढे करावा, असेही आवाहन ‘दिव्य मराठी’ करीत आहे.

शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घ्यायला जागा शिल्लक नाही, असे संबंधित रुग्णालयांकडून सांगण्यात येते आहे. जिल्हा रुग्णालयात जागा उपलब्ध आहे; पण ७०पैकी तब्बल ४२ डाॅक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्यामुळे तिथे सेवा द्यायला डाॅक्टर्स नाही. अशा परिस्थितीत नियंत्रण हाताबाहेर जाऊ नये यासाठी शक्य त्या सर्व घटकांनी प्रशासनाकडे सहकार्याचा हात पुढे करण्याची कधी नव्हे इतकी गरज आता निर्माण झाली. शहरातील कोरोना बाधितांबरोबरच बाधित नसलेल्या परंतु रुग्णालयात दाखल होण्याची गरज असलेल्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले आहेत. दुसरीकडे कोरोना बाधितांनी कोविड केअर सेंटर्सही ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित. पान ४

खासगी रुग्णालयांत जागा नाही; ‘सिव्हिल’मध्येही डाॅक्टर्स नाहीत
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात शहरात २७० रुग्ण काेराेना पॉझिटिव्ह आढळून आले तर दोघांचा मृत्यू झाला. दिवसभरात १८९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या शहरात ३०७९ रुग्ण उपचार घेत आहे. शुक्रवारी दिवसभरात शहरात आरटीपीसीआर चाचणीद्वारे १५२ तर रॅपिड अँटीजन चाचणीद्वारे ११८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २० हजार ४८२ झाली. शहरात ३०७९ ऍक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, ३०४ रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेताहेत.

बातम्या आणखी आहेत...