आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृह:मुंबईत तैलिक समाज विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातून मुंबईत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या तेली समाजातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईत समाजाचे भव्य वसतिगृह निर्माण करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय तैलिक सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी गुणवंतांच्या सत्काराप्रसंगी दिली. लेवा भवनात प्रदेश तेली महासंघातर्फे सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.

अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी हे होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, शिरीष चौधरी, संतोष चौधरी, विष्णू भंगाळे, गुलाबराव वाघ, शरद तायडे उपस्थित होते.

रिंगराेडचे ऑक्टाेबरमध्ये डांबरीकरण व्यवसाय करून इतरांना नोकरी द्या
विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात गुंतवणूक करून तो वाढवावा. व्यवसायात झोकून दिल्याने आयुष्यात चांगली प्रगती होते. मुलांना मोबाइल द्या. मात्र ते काय बघत आहेत, हे पाहण्याची जबाबदारी पालकांची आहे. आजच्या युगातील पालक हे मुलांना त्यांच्या चांगल्या करिअरसाठी प्रोत्साहन देणारे आहेत. तरुण-तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून इतरांना नोकरी देणारे व्हावे, असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...