आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​रामपेठ भागातील दुर्घटना:घराला आग; मजुरीचे 15 हजार रुपये, धान्यासह कपडेही खाक

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या गावातील रामपेठेतील आंबेडकर नगरात साेमवारी सकाळी साडेनऊ वाजता दाेन खाेल्यांच्या घराला अचानक आग लागली. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यात कुटुबांतील तिघांच्या हातमजुरीचे १८ हजार रुपयांची राख झाली. रामपेठेतील आंबेडकरनगरात अकुंश बाविस्कर हा तरुण त्याच्या आई वडिलांसाेबत चार भिंती व पत्र्याच्या तसेच पार्टेशनच्या दाेन खाेल्यात राहताे. तिघेही हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. साेमवारी सकाळी ९ वाजता ते तिघे नेहमीप्रमाणे घरून कामावर जाण्यासाठी निघाले. त्यानंतर पाऊण तासात त्यांना घराला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यांच्या घरातील पलंग, टीव्ही, गाद्या चादरी, अन्नधान्य सर्व साहित्य जळून खाक झाले.

बातम्या आणखी आहेत...