आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेर:जामनेर तालुक्यामध्ये घराला आग; दांपत्याचा होरपळून मृत्यू

जामनेर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • शेजारीपाजारी गाढ झोपेत असल्याने कुणालाही आगीची घटना लक्षात आली नाही

मध्यरात्रीनंतर अचानक घराला आग लागून दांपत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गारखेडा (ता.जामनेर) येथे मंगळवारी पहाटे २.४५ वाजेच्या सुमारास घडली. आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने मित्राकडे झोपायला गेलेला दांपत्याचा तरुण मुलगा या दुर्घटनेत बचावला. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

उत्तम चौधरी (४८) व वैशाली चौधरी (४२) अशी मृतांची नावे आहेत. शेजारीपाजारी गाढ झोपेत असल्याने कुणालाही आगीची घटना लवकर लक्षात आली नाही. मध्यरात्रीनंतर पावणेतीन वाजता चौधरी यांच्या घरासमोर राहणारे सरपंच अशोक पाटील व त्यांच्याकडे आलेले त्यांचे जावई किरण चौधरी यांना धुराच्या वासाने जाग आली. दोघांनी बाहेर येऊन घराला आग लागल्याचे पाहुन त्यांनी आरडाओरड करताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. मात्र, तोपर्यंत चौधरी दांपत्याचा होरपळून मृत्यू झाला होता. दोघांचे मृतदेह पाहून मुलगा मनोज व इतर नातेवाइकांनी आक्रोश केला. तहसीलदार अरुण शेवाळे व पोलिस निरक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...