आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्यभरातील गृहनिर्माण साेसायट्यांनाही आता मिळणार तंटामुक्त पुरस्कार

सुधाकर जाधव | जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शंभर गुणांच्या मूल्यांकनात परिसर स्वच्छता, सुशाेभीकरण, रेन वाॅटर हार्वेस्टिंग, कंपाेस्ट खत निर्मितीचा समावेश

सहकारी गृहनिर्माण सोसायटींमधील आपापसातील तंटे सोडवून सुव्यवस्थापनासाठी सहकार विभागातर्फे सुव्यवस्थापन व तंटामुक्त सोसायटी अभियान राबवण्यात येत आहे. संस्थेचे कामकाज अधिनियम, मंजूर उपविधीनुसार, मनपा कर भरणा, परिसर स्वच्छता व सुशोभिकरण अशा विविध मुद्द्यांवर १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येईल. त्यानुसार पुरस्कार जाहीर हाेईल.

सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी हे अभियान राबवण्याचे आदेश दिले आहेत. सहकारी गृहनिर्माण सोसायटींमधील आपसी तंटे सोडवून सुव्यवस्थापनासाठी सहकार विभागातर्फे सुव्यवस्थापन व तंटामुक्त संस्था अभियान राबवण्यास या वर्षापासून प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी विविध मुद्द्यांवर १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येईल. सुव्यवस्थापन मोहिमंेतर्गत उत्कृष्ट कामकाजाबाबत विविध मुद्द्यांवर सोसायटींचे मूल्यमापन करून उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्थांची निवड करण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्थांचा सहभाग ऐच्छिक आहे. सहायक निबंधक, उपनिबंधक त्यांच्या स्तरावर सहकार खात्याचे अधिकारी, वैधानिक लेखापरीक्षक यांची समिती गठीत करतील. मोहिमंंेतर्गत नाव नोंदवणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना तालुका, वॉर्डस्तरावर २००पेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थांना पहिला, दुसरा व तिसऱ्या क्रमांकासाठी तसेच २००पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या संस्थांची निवड करण्यात येईल. उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहनात्मक प्रशस्तिपत्र व मानचिन्ह देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहकार विभागाशी संपर्क करावा लागेल.

संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी ३० गुण देण्याचाही प्रस्ताव संस्थेतर्फे राबवण्यात येणारे व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी ३० गुण देण्यात येतील. पावसाच्या पाण्याची साठवण करणे, कंपोस्टखत, शेतकरी ते ग्राहक योजनंेतर्गत भाजीपाला, धान्य पुरवठा करण्यासाठी संस्थास्तरावर जागा, सुविधा उपलब्ध करून देणे, वाहनतळाचे सुयोग्य पद्धतीने नियोजन, सदस्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कोविड १९साठी तपासणी व उपचारासाठी सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, इतर नावीन्यपूर्ण उपक्रमांचाही त्यात समावेश आहे.

मनपाचा करभरणा, कचरा वर्गीकरण यासह इतर बाबींचे करणार मूल्यांकन संस्थेचे कामकाज अधिनियम, नियम व मंजूर उपविधीप्रमाणे होणे, भोगवटा शुल्काची आकारणी नियमाप्रमाणे, मासिक देखभाल शुल्काच्या थकीत रकमेवर उपविधीतील तरतुदीने व्याज आकारणी करणे, गृहनिर्माण संस्थांच्या जागेचे हस्तांतरण, मानीव अभिहस्तांतरण केले की नाही, मनपा कर भरणा, सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे, कचरा वर्गीकरण, विल्हेवाट लावली आहे की नाही? अशा विविध मुद्द्यांवर सोसायटींचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...