आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:खूप पुस्तके वाचनापेक्षा माणूस किती संवेदनशील हेच अतिशय महत्त्वाचे

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परिवर्तन पुस्तक भिशीत कवयित्री खल्लाळ यांनी मांडली सडेतोड भूमिका

पुस्तक आपल्या जगाला समृद्ध करणारी गोष्ट आहे. वाचन ही अनेक अंगाने, अनेक आयामी बाब आहे. आपल्याकडे अनेक पुस्तकं आहेत. अनेक भाषेतील पुस्तक वाचली आहेत. खूप पुस्तक वाचली ह्यापेक्षा माणूस किती संवेदनशील आहे हे महत्त्वाचे आहे, असे मत परिवर्तन पुस्तक भिशी उपक्रमात बोलताना कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी व्यक्त केले.

माणूस विवेकी, प्रामाणिक असावा. माणुसकीचा झरा त्यात असावा तरच वाचनाचा उपयोग झाला अस म्हणावं. आपण अधिक स्वीकारशील व्हावं. चिंतनशील व्हावं. स्वीकारशील होणं, इतरांच्या भावना समजून घेणं, द्वेष व हिंसा यापासून लांब जाणं ह्यासाठीच वाचायला हवं. किंवा वाचन केल्यावर हा बदल आपल्यात झाला तरच वाचन केलं ह्याचा फायदा आहे. वाचनाने विज्ञाननिष्ठ व विवेकी माणूस निर्माण होत असतो. कारण वाचनाचा संस्कार जोपासणे ही संवेदनशील माणूस असल्याची खूण आहे. पुस्तक भिशी हा परिवर्तनचा परिवर्तनशील उपक्रम असून, यातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी बळ मिळते. जगातील विविध घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे. परिवर्तनचे हे विवेकी कार्य मला यासाठी महत्त्वाचे वाटते असे मत खल्लाळ यांनी मांडले.

कार्यक्रमात ‘माझा समकाळ’ कविता भावली
ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्या आग्रहातून सुचिता खल्लाळ यांनी “माझा समकाळ” ही कविता सादर केली. सांगली येथील विजया हिरेमठ यांनी विचार मांडले. चित्रकार विकास मलारा, अंजली पाटील, अश्विनी बाविस्कर यांनी त्यांच्या वाचनाविषयी सांगितले. नितीन सोनवणे, ज्ञानेश्वर शेंडे, मुकेश जाधव, श्रीकांत पाटील यांची पुढील महिन्यातील पुस्तक भिशीतील भाग्यवान वाचक म्हणून निवड करण्यात आली. ज्ञानेश्वर शेंडे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. कार्यक्रमोच सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले, तांत्रिक बाजू मनोज पाटील यांनी सांभाळली.

बातम्या आणखी आहेत...