आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशंभर, दाेनशे व पाचशेच्या बनावट नाेटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या ३० वर्षिय तरुणाला पाेलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधून ९४९ नकली नाेटांसह ताब्यात घेतले आहे. त्याच्या कुसुंबा येथील घरी गुरुवारी पहाटे छापा टाकून नाेटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर व काेरे पेपर व हिरव्या रंगाची शाई असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सात दिवसांची पाेलिस काेठडी मिळाली. दरम्यान, या संशयितासाेबत बनावट नाेटा वितरीत करणारी आंतरराज्यीय टाेळी असण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीवरून पाेलिसांनी सापळा रचून देवीदास पुंडलिक आढाव (वय ३०, रा. कुसुंबा, ता. जि. जळगाव) याला पाेलिसांनी एमआयडीसी व्ही-सेक्टरच्या गट नंबर ३१ मधील प्लांट नं. ६२ येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून नकली नाेटा छापण्याचे साहित्य जप्त केले.
त्याच्या विरुध्द पाेलिस काॅन्स्टेबल सचिन सुरेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ४८९ अ, ब, क, ड व इ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पीएसआय निलेश गाेसावी हे करीत आहेत. नकली नाेटांसह पकडलेला संशयित देविदास आढाव याला गुरुवारी न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी सात दिवसांच्या काेठडीची मागणी सरकारी वकील अॅड. स्वाती निकम यांनी केली हाेती. काेर्टाने ती मान्य केली.
पाेलिसांनी संशयिताच्या घरून ९४९ नकली नाेटांसह भारतीय चलनाच्या पाचशे रुपयांच्या पंटरजवळ सापळ्यासाठी दिलेल्या दाेन खऱ्या नाेटा, ४० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची बजाज प्लसर, क्रं.एमएच १९-डीयू १२०३, एक ए-४ साइजचा काेऱ्या कागदाचा पेपर रिम, हिरव्या रंगाची चमक असलेली चिकटपट्टी टेप असा एकूण ४६ हजार रुपयांचा एेवज जप्त केला आहे. धागेदाेरे शाेधण्याचे आव्हान बनावट नाेटांसह सापडलेल्या संशयिताकडे आणखी नकली नाेटा असण्याची शक्यता पाेलिसांना आहे. संशयिताने या नाेटा काेणाकाेणाला वितरीत केल्या, संशयिताचे आणखी साथीदार आहेत काय, नकली नाेटा बाजारात आणणारी आंतरराज्य रॅकेट तर नाही ना? याचा शाेध घेण्याचे पाेलिसांसमाेर माेठे आव्हान आहे.
पाेलिसांनी माेठ्या प्रमाणावर नकली नाेटा जप्त केल्या आहेत. त्या कमी मूल्य किंमतीच्या वेगवेगळ्या सीरीजच्या आहेत. तसेच संशयितासह रॅकेटने बाजारपेठेत अगाेदरच वितरीत केल्या असण्याची शक्यता आहे. अशा नकली नाेटांद्वारे जर काेणाची फसवणूक झाली असेल तर अशा नाेटा अर्जासह पाेलिसात जमा कराव्या असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
..तर जन्मठेपेची शिक्षा : संशयिताविरुद्ध भादंवि कलम ४८९ अ, ब, आणि ड या तीन कलमान्वये गुन्हा सिद्ध झाल्यास प्रत्येकासाठी संशयिताला मरेपर्यंत जन्मठेप हाेऊ शकते. तर ४८९ क अन्वये ७ वर्ष आणि तर ई अन्वये एनसी दाखल हाेईल.
पाेलिसांनी जप्त केेलेल्या बनावट नाेटा.
शंभर रुपयांच्या 7EP 911460, 7FM 830284, 5UP636237 व 7AD 810727 याचार सीरीजच्या २४५ तर दाेनशे रुपयांच्या 7 FC 882887, 1FH 620050, 7FC882839, 5Fk250736, 7FC 882889, 0NA189251, 7AD 132958, 7FC 882224, 7FC 882225, 7BF 910396 व 5FK 250786 या सीरीजच्या ६९२ नाेटा, पाचशे रुपयांच्या 2HN 257539, 1WF 744278 या सीरीजच्या दहाअशा एकूण ९४९ बनावट नाेटा जप्त केल्या.
सीसीटीव्ही फुटेेजची तपासणी
संशयिताला पाेलिसांनी प्राथमिक विचारपुस केली असता त्याने आपण एकटेच यू-ट्युबवरील व्हीडीआे पाहून नकली नाेटा बनवत असल्याचे पाेलिसांना सांगितले. ताे महिन्याभरापासून हे काम करीत असल्याचे सांगितले. दरम्यान, त्याने घरात अनेक चैनीच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. त्यासाठी याच नाेटा दिलेल्या असल्याचा पाेलिसांना संशय आहे. त्याने घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याने आपल्या साेबत काेणीच नसल्याचे सांगितले. १० ते १५ हजार रुपयांत एक लाख रुपये वाटल्याचे सांगितले. ताे अनेक महिन्यांपासून हा उद्याेग करीत असल्याचा संशय आहे. त्याचे बँक खाते, काॅल रेकाॅर्ड व सीसीटीव्ही फुटेज पाेलिस तपासताहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.