आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भांडुप येथील कोव्हिड केअर सेंटरला लागलेल्या भीषण आगीत तालुक्यातील वेले आखतवाडे येथील रहिवासी असलेले दोन पती-पत्नींचा मृत्यू झाल्याची माहिती वेळे येथून ग्रामपंचायत उपसरपंच दीपक पाटील यांनी दिली आहे.
भांडुप येथील कोव्हिड केअर सेंटर ला लागलेल्या भीषण आगीत तालुक्यातील वेले आखातवाडे येथील दांपत्याचा मृत्यू झाला असून याबाबत वृत्त असे की गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भांडुप येथील मॉल मध्ये असणाऱ्या कोव्हीड सेटला भीषण आग लागली त्यात चोपडा तालुक्यातील वेले-आखातवाडे येथील आबाजी नारायण पाटील (६५) आणि त्याची पत्नी सुनंदा बाबाजी पाटील (६०) या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. या दाम्पत्याचा मुलगा स्वप्निल आबाजी पाटील मुबंई येथे शासकीत सेवेत नोकरीला असून आपल्या आई-वडिलांना कोरोना झाला म्हणून त्यांना उपचारासाठी भाडूप मध्ये सनराइज् कोव्हीड सेंटर मध्ये भरती होते त्यांच्यावर उपचार सुरू होते हॉस्पिटलला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे वेले आखातवाडे गावात हळहळ व्यक्त करण्यात असून या बाबत अधिकृत माहिती ग्रामपंचायत उपसरपंच दीपक पाटील यांनी दिली आहे.
मयत आबाजी नारायण पाटील हे अनेक वर्ष चोपडा येथील एका खाजगी जिनिंग मध्ये मध्ये कामाला होते ते दररोज सायकलने ये जा करायचे, एक कष्टकरी माणूस म्हणून त्यांची गावात ओळख होती आणि नशिबाने मुलगा आता नोकरी लागल्याने त्यांचे सुगीचे दिवस आले होते मात्र त्या मुलाला आपल्या आई-वडिलांना आगीत प्राण गमवावे लागल्याने त्यांना अतीव दुःख झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.