आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यात लाकडी दांडा मारून पत्नीचा खून:जळगावमधली घटना; स्वयंपाक न केल्याने पतीचा राग झाला अनावर

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाक केला नाही म्हणून पतीने लाकडी दांडा डोक्यात मारून पत्नीचा खून केला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर 22 दिवसांनी घटना उघडकीस येऊन पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. भुरकीबाई बाळू बारेला (वय 30) असे मृत महिलेचे नाव आहे. बारेला कुटुंबीय मुळचे मध्यप्रदशातील आहे. कामाच्या निमित्ताने ते एरंडोल जिल्ह्यात स्थायिक झाले होते.

काय आहे घटना?

1 जून 2022 रोजी भुरकीबाई यांनी रात्री स्वयंपाक केला नव्हता. पती बाळू भाया बारेला हा घरी आल्यानंतर जेवण मागत होता. स्वयंपाक बनवला नाही याचा राग आल्याने त्याने पत्नी भुरकीबाईच्या डोक्यात दांडा मारून तिचा खून केला. यानंतर तो पळून गेला. पत्नीचा मृत्यू का व कसा झाला याची माहिती नसल्याचा बनाव त्याने केला. दरम्यान भुरकीबाइचा भाऊ सुमसिंग फुलसिंग बारेला याने तिच्या पतीवर संशय घेतला होता. मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्यामुळे अखेर शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी तपासणी केली.

पतीवर गुन्हा दाखल

22 दिवसानंतर पोलिसांना अहवाल समोर आल्याने डोक्यात दांडा घातल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण समोर आले. त्या आधारावर पोलिसांनी बाळुच्या मुसक्या आवळल्या असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी बाळुच्या विरुद्ध 22 जून रोजी एरंडोल पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे पुढील प्रकरणाचा तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...