आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:कौटुंबिक वादातून पतीचा पत्नीवर विळ्याने वार, उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू, पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

चोपडा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा शहरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोपडा शहरातील फुले नगर भागातील रहिवासी असलेले संजय पुंजू चव्हाण (४८) यांनी कौटुंबिक वादातून पत्नी मीराबाई चव्हाण (४०) हिच्या उजव्या पायाच्या मांडीवर विळ्याने वार केल्याने तिला गंभीर दुखापत झाली. तिला दुखापतीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मीराबाई चव्हाण हीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, संजय पुंजू चव्हाण व पत्नी मीराबाई संजय चव्हाण (दोघे रा. फुले नगर,चोपडा) यांच्यात सतत तीन दिवसांपासून कौटुंबिक वादातुन घरात कलह सुरू होता. याच पार्श्वभूमीवर दि. ५ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या वादातून आपल्या राहत्या घरी संतापात संजय चव्हाण याने पत्नी मीराबाई चव्हाण हिच्या उजव्या पायाच्या मांडीवर विळ्याने वार करून गंभीर दुखापत केली. या दुखापतीतून मीराबाई हिस मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलगा सागर संजय चव्हाण याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...