आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात तरूणाचा खून:गुप्तांगांवर केले वार नंतर दाबला गळा;. मृतदेह पुरला नेपानगरच्या नाल्यात, दोघांना बेड्या

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रायपूर गावातून 17 एप्रिल पासून बेपत्ता असलेल्या भूषण जयराम तळेले (वय 34) यांचा खून झाल्याचे बुधवारी समोर आले. यानंतर गुरुवारी मध्यप्रदेशातील नेपानगर भागातील एका जंगलात नाल्यात पुरलेला तळेले यांचा मृतदेह एमआयडीसी पोलिसांनी बाहेर काढला. भूषण यांचा खूनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणात जळगावातील एमआयडीसी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपींची कबुली

17 एप्रिल रोजीच त्यांचा खून केल्याची कबुली अटकेत असलेल्या भिकन श्यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी यांनी दिली.

अशी घडली घटना

घटना अशी की, भूषणची व भिकन यांची एकमेकांशी होती. यातून त्यांच्या कुटुंबियांशीही ओळक झाली. याच ओळखीतून भूषण आणि भिकन यांचे काही कारणामुळे मतभेद झाले. चटईच्या कंपनीत काम करणाऱ्या भूषणला नवीन काम मिळवून देण्याचा बहाणा करून भिकन व विठ्ठल हे दोघे 17 एप्रिल रोजी भुसावळला घेऊन गेले. तेथे तीघे जण दारू प्यायले. यानंतर पुढे मुक्ताईनगर येथे जाऊन पुन्हा दारू पिली. दुपारी चार वाजेच्या सुमारास ते नेपानगर परिसरातील एका जंगलात पोहोचले होते. या ठिकाणी दोघांनी भूषणच्या गुप्तांगावर मारहाण केली. दोरीने गळा आवळून त्याचा खून केला.

मृतदेह पुरला नाल्यात!

भूषणचा मृत्यू झाल्यानंतर दोघांनी त्याला शेजारीच असलेल्या एका नाल्यात पुरले. माती, दगड टाकून त्याचा मृतदेह पुरल्यानंतर दोघेजण भुषणची दुचाकी घेऊन पुन्हा रायपूर येथे आले. यानंतर दोघेही सामान्यपणे वागत होते. यानंतर भिकन भूषणच्या कुटुंबियांना फोन करुन भूषणला पुण्यात, गुजरात, भुसावळ येथे पाहिल्याचे सांगत राहिला. बरेच दिवस झाले तरी पती परत न आल्यामुळे आशा यांनी पोलिसांना गळ घातली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, गफुर तडवी, सिद्धेश्वर डापकर, सुधीर साळवे यांच्या पथकाने भिकन व विठ्ठल यांचा चौकशीसाठी बोलावून घेतले.

संशयित आरोपी भिकन परदेशी
संशयित आरोपी भिकन परदेशी

आशा यांना फोन येणाऱ्या मोबाइल क्रमांकाची माहिती पोलिसांनी काढली. पोलिसी खाक्या दाखवताच भिकन व विठ्ठल यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

संशयित आरोपी विठ्ठल परदेशी
संशयित आरोपी विठ्ठल परदेशी

गुरुवारी याच पथकाने नेपानगर येथे जाऊन भूषणचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पतीचा खून झाल्याची माहिती मिळताच पत्नीसह कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला. भूषण घरी येणार आहे असे सांगत, गेल्या दीड महिन्यांपासू भिकन त्यांची दिशाभुल करीत होता. गुरुवारी भूषणचा मृतदेेह सापडला. या गुन्ह्यात खूनाचे कलम वाढवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...