आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:भडगावात एक पाॅझिटिव्ह; सर्दी, ताप येत असेल तर काेराेना टेस्ट करा

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गुरुवारी सात रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. त्यात जळगाव ग्रामीण १, भुसावळ ५, भडगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. दिवसभरात पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली.

दरम्यान, वातावरणात गेल्या आठ दिवसांपासून बदल झाल्याने सर्दी, खाेकला, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ हाेऊ लागली आहे. तीन दिवसांपेक्षा जास्त त्रास हाेत असेल तर वेळ वाया न घालवता तातडीने काेराेना टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जाताे आहे. साधा ताप, सर्दी हे कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांमध्ये ही लक्षणे दिसताच घाबरून न जाता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आराेग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...