आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यादेशानंतरही मुहूर्त नाही:माेहाडी-म्हसावद रस्ता झाला तर सहा किमी अंतर वाचणार

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हसावद, बाेरनार येथून जळगावला येण्यासाठी साेयीचा ठरणारा माेहाडी ते लमांजनमार्गे म्हसावद रस्त्याचे काम मंजूर हाेऊन बरेच दिवस लाेटले गेले. मक्तेदाराला कार्यादेश दिल्यानंतरही कामाला सुरुवात झालेली नाही. पंधरा दिवसांपूर्वीच दापाेरा येथील पुलाचे उद्घाटन झाले; परंतु रस्ता नसल्याने वाहतुकीचा खाेळंबा झाला. जळगाव येथून म्हसावद मार्गे एरंडाेल जाण्यासाठी वाहनधारकांना शिरसाेली, वावडदामार्गे म्हसावदला प्रवास करावा लागताे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या माेहाडी येथून दापाेरा, लमांजनमार्गे म्हसावद येथे जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे १८ किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. मनपा हद्द संपल्यानंतर माेहाडी गावाच्या अलीकडून रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे; परंतु मक्तेदाराकडून कामाला सुरुवात नाही. जळगावहून म्हसावद जाण्यासाठी २४ किमीचा प्रवास करावा लागताे; परंतु माेहाडीमार्गे म्हसावद जाण्यासाठी केवळ १८ किमी प्रवास करावा लागेल. या प्रमुख जिल्हा मार्गामुळे वाहनधारकांची वेळ, इंधनाची बचत हाेईल. सहा किमीचा फेरा टळेल.

माेहाडीजवळ काँक्रिटीकरण : माेहाडी गावाजवळ रस्त्याचे काँक्रिटीकरण होईल. याशिवाय दापाेरा ते लमांजन दरम्यान रस्त्याचे नव्याने काम करावे लागेल. सुमारे ३.७५ किमी लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्गाचे डांबरीकरण केले जाईल. मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...