आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाखला नाही:मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम नसले तर पुर्णत्वाचा दाखला नाही ; मनपाच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकामाच्या मंजुरीसाठी मनपाच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केला जातो. परंतु, मंजुरीनंतर प्रत्यक्षात नकाशाप्रमाणे बांधकाम केले जात नसल्याचे प्रकार समोर येत आहे. आगामी काळात मंजुर नकाशाप्रमाणे बांधकाम नसल्यास संबंधिताना पुर्णत्वाचा दाखला मिळणार नाही असा इशारा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिला आहे.

गेल्या महिन्यात वास्तुविशारद, आर्किटेक इंजिनिअर यांची बैठक झाली होती. त्यात या संदर्भात सुचना दिल्या होत्या. बांधकाम प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. १७ जून रोजी आयुक्तांसह नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही बांधकामांची पाहणी केली. त्यात नकाशाप्रमाणे बांधकाम नसल्याचे आढळून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...