आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्युषण महापर्व:सकारात्मक विचारांनी दिवस सुरू झाला तर रात्री निवांत झाेप लागते

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जीवन क्षणभंगुर आहे. अर्थात ते पाण्याच्या बुडबुड्यासारखे आहे. जप, तप, स्वाध्याय नियमित केला तर त्यातून सदाचारी माणूस घडताे. समाेरचा व्यक्ती काय सांगताे ते एेकून घेण्याची क्षमता असली तर मन:शांती लाभते. सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात झाली तर रात्री निवांत झाेप लागते, असा सल्ला उपासक निर्मल नाैलखा यांनी येथे दिला.

शहरातील अणुव्रत भवनात पर्युषण महापर्व आराधना झाली. त्यात निर्मल नाैलखा व उपासक सूरजमल सूर्या यांनी संवाद साधला. नमस्कार महामंत्र जाप केल्याने नवचेतना मिळते. या मंत्राच्या प्रत्यक्ष अक्षराेच्चाराचे कंपन हे मेंदूला विचार करण्यास भाग पाडते. आचार्य महाप्रज्ञद्वारा दिलेले अवदान प्रेक्षाध्यानचा निरंतर प्रयाेग मनुष्य आपल्या जीवनात शांतीचा मार्ग प्रस्थापित करू शकताे, असे ते म्हणाले. तेरापंथचे शिल्पकार आचार्य श्री भिक्षू आणि उत्तरवर्ती आचार्य यांची धर्मक्रांती याबाबत सहज व साेप्या शब्दात माहिती देण्यात आली. भगवान महावीर यांनी मांडलेल्या सिद्धांतावरही त्यांनी विचार व्यक्त केले. क्षमायाचना दिवसाचे महत्त्वही स्पष्ट करून सांगण्यात आले.

तेरापंथ सभाध्यक्ष जितेंद्र चाेरडिया, युवक परिषद अध्यक्ष सुदर्शन बैद, महिला मंडळ अध्यक्षा नम्रता सेठिया, ज्ञानशाळा मुख्य प्रशिक्षिका विनीता समदरिया, महासभा परिवारातर्फे अनिल सांखला यांनी मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभा मंत्री नीरज समदरिया यांनी केले, अशी माहिती तेरापंथ सभेचे नोरतमल चाेरडिया यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...