आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:मागण्या मान्य न झाल्यास अध्यापक काम बंद करणार, जिल्हाधिकारी यांना निवेदनातून इशारा

जळगाव7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

सातव्या वेतन आयोगाच्या प्रमाणे विविध प्रकारचे भत्ते द्यावे, करार पद्धतीने नियुक्तीचा निर्णय रद्द करावा अशा मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक १४ मार्चपर्यंत आंदोलन करत आहे. बुधवारी हे आंदोलन तीव्र झाले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यापकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. मागण्या मान्य करा, अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशाराही दिला.

अनेक वर्षांपासून मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. काम करत असताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा अशीही विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. त्यावर जिल्हाधिकारी राऊत यांनी मागण्या शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी शासनापर्यंत आमच्या मागण्या पोहोचवा, झोपलेले वैद्यकीय शिक्षण खाते कधी जागे होईल? असा सवालही अध्यापकांनी केला.

पुढील दोन दिवस अधिष्ठाता कार्यालयासमोर घोषणा देऊन आंदोलन केले जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनचे जळगावचे सचिव डॉ. योगिता बावस्कर, डॉ.किशोर इंगोले, डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ. अरुण कसोटे, डॉ.संदीप पटेल, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. संगीता गावित, डॉ. इमरान तेली, डॉ. भारत घोडके, डॉ. विजय गायकवाड, डॉ. धनश्री पाटील, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ.निलेश देवराज, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. किरण सोनवणे, डॉ. मनोज पाटील, डॉ. हर्षल महाजन, डॉ. मोनिका युनाती, डॉ. अनिल पाटील, डॉ.श्रीनिवास लोंढे आदी अध्यापक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...