आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुप्रतीक्षित आणि वर्दळीच्या इच्छादेवी-डीमार्ट या अडीचशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले आहे. त्याच्या उजव्या बाजूचे काम शनिवारी पूर्ण झाले. येत्या १ मार्चनंतर ती बाजू वापरासाठी खुली हाेईल. मात्र, डाव्या बाजूचे काम जाेपर्यंत अतिक्रमण काढले जात नाही ताेपर्यंत सुरू हाेणे शक्य नाही. त्यामुळे हा भाग साेडून पुढचे काम हाती घ्यावे लागेल, असे संकेत मक्तेदाराने दिले आहेत.
अर्थात, या रस्त्याच्या कामाचे भवितव्य आता महापालिकेच्या भूमिकेवरच अवलंबून आहेे. दाटवस्तीचे अतिक्रमण महापालिकेने हटवून दिले तरच या बाजूचा रस्ता ३१ मार्चपर्यंत पूर्ण हाेणे शक्य आहे. त्याचप्रमाणे या पुढील डीमार्ट चाैकातून शहराला पाणीपुरवठा करणारी वाघूर धरणाची मुख्य जलवाहिनी गेली असून ती वारंवार फुटत असल्याने त्याबाबत पालिकेने ना हरकत पत्र दिले तरच या चाैकात काँक्रीटचे काम हाेणार आहे.
अन्यथा, येथे डांबरीकरण करण्यात येणार आहे. इच्छादेवी ते शिरसाेली रस्त्यावर रायसाेनी इन्स्टिट्यूटच्या अलीकडेपर्यंतचा सुमारे ३७०० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मक्तेदाराच्या माध्यमातून करत आहे. वर्षभराची मुदत असलेल्या या मार्गावर इच्छादेवी ते डीमार्ट पुढील चाैक (माेहाडी फाट्यापर्यंत) हा सुमारे साडेतीनशे मीटर अंतराचा रस्ता आहे.
अतिक्रमण हटवल्यावर काम
शहरातील इच्छादेवी ते डीमार्ट या वर्दळीच्या रस्त्याचे एका बाजूचे काँक्रिटीकरणाचे काम मक्तेदाराकडून करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला असलेले अतिक्रमण महापालिका प्रशासनाने काढून दिल्यानंतरच या ठिकाणी पुढील काम मार्गी लागू शकणार आहे. -गिरीश सूर्यवंशी, अभियंता, साइट इन्चार्ज, सार्वजनिक बांधकाम विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.