आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:सफाईचा प्रश्न सुटला नाही तर वाॅटरग्रेस ला रामराम

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील साफसफाईचा प्रश्न गंभीर हाेत चालला आहे. १०० पैकी ३५ वाहने बंद राहत असून कचरा संकलन हाेत नसल्याने रस्त्यावरील कचरा वाढला आहे. असे असताना दंडाचा आकडा पाहता वाॅटरग्रेस कंपनीच्या चुकांवर पांघरूण घातले जात असल्याचा संशय व्यक्त केला जाताे आहे. मक्तेदाराकडून कार्यपद्धतीत बदल न झाल्यास काळ्या यादीत टाकून मक्ता बंद करून पर्यायी व्यवस्थेचा विचार केला जाणार आहे.

महापालिका निवडणुकीला अवघे सात महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सत्ताधारी ठाकरे गटाकडून प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जनतेशी निगडीत प्रत्येक प्रश्न साेडवण्यासाठी आता घाई सुरू झाली आहे. त्यासाठीच मंगळवारी महापाैर जयश्री महाजन यांच्या दालनात बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते.

यावेळी आयुक्त विद्या गायकवाड, उपमहापाैर कुलभूषण पाटील यांच्यासह सर्वच विभागांचे प्रमुख उपस्थित हाेते. दुपारी १२.३० वाजेला सुरू झालेली बैठक सायंकाळी ६ वाजता संपली. यात अकरा विभागांकडील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांच्या अडचणी एेकुण घेत त्या साेडविण्यासाठी नियाेजनबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

१५० जागा कंत्राटी भरणार : मनपाचा आकृतीबंध मंजूर हाेत नसल्याने आयुक्तांच्या अधिकारात सहा महिन्यांसाठी तांत्रिक व अतांत्रिक कामांसाठी १५० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी लवकर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.

बायाेमायनिंगसाठी निविदा : शहरातील गाेळा हाेणाऱ्या कचऱ्याचे ढिग तयार हाेत आहेत. परंतु त्यावर प्रक्रीया हाेत नाही. त्यामुळे एक लाख ६० हजार क्युबिक मिटर कचऱ्यावर बायाेमायनिंगसाठी दहा दिवसांची निविदा प्रक्रीया राबवण्याचा निर्णय झाला. यासाठी साडे सात काेटी रूपयांचा निधी मंजुर आहे.

पाणीपुरवठ्याचे १६ पैकी १३ युनिट सज्ज : अमृत अभियानांतर्गत झालेल्या कामानुसार मनपाच्या १६ पैकी १३ युनिटमध्ये नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा करणे शक्य आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत उर्वरीत कामे पूर्ण करून डिसेंबरमध्ये शहरातील बहुसंख्य भागात अमृत याेजनेतून पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले.

दंडात्मक कारवाईचा इशारा
वाॅटर ग्रेस कंपनीच्या तक्रारी वाढल्या आहेत. ३५ वाहने बंद असून त्यात १७ घंटागाड्यांचा समावेश आहे. कचरा उचलला जात नाही. त्यामुळे कामात सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याचे आदेश महापाैरांनी दिले. आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मक्तेदाराच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी सकाळपासूनच फिल्डवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. साफसफाई हा नागरीकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय असल्याने त्यात काेणत्याही पातळीवर हलगर्जीपणा हाेवू नये अशा सक्त सुचना देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...