आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट कार्ड:स्मार्ट कार्ड नसेल तर 1 जुलैपासून सवलतधारकांना एसटीचे पूर्ण तिकीट ; खासगी एजंटांना आगारात जागा देण्यात येणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, स्वांतत्र्य साैनिक, पत्रकार यांच्यासह २९ समाज घटकांना प्रवासी भाड्यात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. ही सवलत मिळवण्यासाठी पात्र लाभार्थींकडे एसटीचे स्मार्ट कार्ड असणे अनिवार्य आहे. हे कार्ड काढण्यासाठी लाभार्थींना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जुलैनंतर सवलतधारक प्रवाशांकडे स्मार्ट कार्ड नसले तर त्यांना पूर्ण तिकीट घेणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, खासगी एजंटांनादेखील विभागातील आगारात जागा देण्यात येणार असल्याने स्मार्ट कार्ड काढण्याला चालना मिळणार आहे. एसटी महामंडळाने लाभार्थींकडे स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे; मात्र अनेक आगारात कोरोना व एसटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे स्मार्ट कार्डची नोंदणीच झालेली नाही; मात्र आता एसटीतर्फे कार्डच्या नाेंदणीला गती देण्यात आली आहे. खासगी एजंटांना देखील नोंदणीसाठी एसटी आगारात जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियेला चालना मिळेल. जळगाव विभागात ७१ हजार ५६६ कार्ड धारकांमध्ये १४ हजार २०१ कार्ड वाटप करण्याचे बाकी आहेत. यात ज्येष्ठांची संख्या कमी तर विद्यार्थी अधिक आहेत.

बातम्या आणखी आहेत...