आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:आनंदी वातावरण निर्माण करायचे असेल तर समाजाला मदत करा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदी वातावरणात राहायला कोणाला आवडत नाही? पण आनंदी राहण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावेच लागतात, जसे गोरखपूरपासून ४० किमीवरील सरदारनगर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अल्पा निगम यांनी केले. त्या पहिल्यांदा येथे रुजू झाल्या तेव्हा विद्यार्थ्यांची उपस्थिती ४०% पेक्षा कमी होती. आज शाळेत २५० विद्यार्थी आहेत आणि उपस्थिती ९५% च्या वर आहे. हा मोठा बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी काय केले? प्रथम त्यांना समजले की, मुले शिकण्यात रस घेत नाहीत. पहिली प्राथमिक शाळा भाषा प्रयोगशाळा स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते, तिथे विद्यार्थी त्यांचे उच्चार आणि भाषा सुधारतात. मुलांना शिकण्यास मदत करण्यासाठी त्यांनी स्थानिक बोलीभाषेतील पाठ्यपुस्तके तयार करण्यास सुरुवात केली. या कामासाठी २०१६ मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला होता. नंतर कठपुतळ्यांचा वापर केला आणि १९५ निरक्षर मातांना प्राथमिक शाळेत दाखल केले. यामुळे त्यांना २०१८ मध्ये राज्य शिक्षक पुरस्कार मिळाला. तेथे १२ वर्षांच्या सेवेत अल्पा यांनी १५ गावांमध्ये ९२ चौपालांचे आयोजन केले आणि ग्रामीण भागातील मुली व महिलांमध्ये शिक्षण, जपानी एन्सेफलायटिस, आरोग्य, स्वच्छता, मासिक पाळी इ.साठी कठपुतळीसारख्या नावीन्यपूर्ण गोष्टींसह जनजागृतीचे कार्यक्रम राबवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेत स्मार्ट क्लास आणि ८५०० पुस्तकांचे वाचनालय तयार झाले. त्यांनी ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, डाउन सिंड्रोमसह विशेष गरजा असलेल्या मुलांसोबत काम केले. आज ही मुले पेन्सिल पकडू शकतात, रंग भरू शकतात, कविता म्हणू शकतात. या आठवड्यात विशेष गरजा असलेल्या मुलांवर संशोधन प्रकल्पासाठी अल्पा यांची फुल ब्राइट स्कॉलरशिपसाठी निवड झाली. त्या जुलै २०२३ मध्ये अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीला ५ महिन्यांसाठी भेट देणार आहेत आणि आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांसोबत सहयोगी शिक्षण घेणार आहेत!

एका वर्गाच्या विकासासाठी एका व्यक्तीचे प्रयत्न म्हणून हे उदाहरण नाकारू नका. अशा गोष्टी सध्याच्या व्यवस्थेतही घडू शकतात. त्याचे एक उदाहरण. तणावमुक्तीसाठी संगीत हे उत्तम औषध आहे, असे मी म्हटले तर कोण नाकारेल? पण दिवसभराच्या मेहनतीनंतर संध्याकाळी गीत गाणे म्हणजे कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम व्हावा आणि त्यामुळे लोकांशी चांगले संबंध व एकंदर आनंद मिळावा, तेही कामाने कंटाळलेल्या पोलिसांसाठी... आपल्यापैकी बहुतेकांसाठी हे नवीन आहे. होय, महाराष्ट्रातील ३०० पोलिस ठाण्यांचे पोलिस रात्री उशिरा ठाण्यांमध्ये गाणी गाऊन आपला थकवा घालवत आहेत! बंदोबस्त ड्यूटीमध्ये दिवसभराच्या मेहनतीनंतर हे पोलिस स्टेशनवर जातात, जवळच्या गुरुद्वाराने दान केलेल्या उपकरणांनी बनवलेल्या खास ऑडिओ रूममध्ये आवडती गाणी गातात आणि मग घरी जातात. १५०० हून अधिक पोलिस दररोज हे करतात. या उपक्रमाचा सर्वात मोठा परिणाम त्यांच्या घरांमध्ये होताना दिसत आहे. आज गाणी गुणगुणत दारावरची बेल वाजवतात, घरी येताच मुलांना मिठी मारतात. त्यांच्या कौटुंबिक जीवनातील हा मोठा बदल हळूहळू दुसऱ्या दिवशी कामाच्या ठिकाणी त्याचा परिणाम दाखवत आहे. कामाची जबाबदारी घेत ते काम उत्कृष्टतेकडे नेत आहेत. फंडा असा ः आनंददायी समाज घडवण्यासाठी आणि अशा वातावरणात राहायचे असेल तर आपणही काही योगदान दिले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...