आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मशीन दाखल:पिंप्राळा रेल्वेगेटकडे जायचे तर बजरंग बोगद्यातून जा; अखेर आर्मसाठी खोदकामास झाली सुरुवात

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपासून लांबलेल्या पिंप्राळा रेल्वेगेटवरील उड्डाणपुलावरील आर्मच्या कामाला बुधवारी प्रत्यक्षात सुरुवात झाली. सहा ठिकाणी कॉलम उभारण्यात येत आहेत. संपूर्ण रस्ताच व्यापला जाणार असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी महारेलने बॅरिकेटिंग लावली आहे. त्यामुळे कारचालकांना पिंप्राळा रेल्वेगेटकडे जायचे तर बजरंग बोगद्यातून जाणे सोयीचे ठरणार आहे.

भोईटेनगरातील पिंप्राळा रेल्वे गेटवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलावरून पिंप्राळा गावाकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग (आर्म) तयार केला जात आहे. महारेलने नवीन डिझाइन तयार करून कामाला सुरुवात केली आहे. यासाठी महापालिकेनेही ना हरकत दिली आहे. दरम्यान रेल्वेगेटपासून भिकमचंद जैन नगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सहा ठिकाणी कॉलम उभारले जाणार आहेत. सहा ठिकाणी २४ खड्डे खोदले जाणार आहेत. यासाठी आधुनिक मशीनही दाखल झाल्या आहे.