आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेची मुदत संपायला अवघे चार महिने शिल्लक असताना महापाैर विरुद्ध अायुक्त असा संघर्ष रंगण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या कामांना मनपाकडून प्राधान्य दिले जात नसल्याने वादामागचे मूळ कारण अाहे.
जनतेच्या समस्या साेडवण्यासाठी प्रशासन अपूर्ण पडत अाहे; परंतु त्याचे खापर नगरसेवकांवर फाेडले जात अाहे. अायुक्त राज्यकर्त्यांच्या दबावात काम करीत असल्यामुळेच जनतेचे प्रश्न सुटण्यास अडचणी येत असल्याचा थेट अाराेप महापाैरांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे नाव न घेता केला अाहे.
मनपाच्या निवडणुकीपूर्वीच ठाकरे गट व शिंदे गट असा संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. मनपात शिंदे गटाचे १५ नगरसेवक अाहेत. साेबतीला भाजपची साथ अाहे. तर सत्तेतील ठाकरे गटात ठाकरे गटाचे १३ नगरसेवक व बंडखाेर नगरसेवक असे राजकीय बळ अाहेे.
मनपाकडून सत्ताधाऱ्यांएेवजी शिंदे गटाच्या नगरसेवकांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याची टीका हाेत अाहे. महापाैर जयश्री महाजन यांनी मनपा प्रशासन राज्यातील शिंदे सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा अाराेप केला अाहे.
अायुक्तांना सुचवलेली कामे टाळली जातात
महापाैर महाजन यांनी अायुक्त डाॅ. विद्या गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नागरिकांच्या समस्या असाे की प्रशासकीय कामातील गतिमानता असाे याबाबत सूचना केल्यानंतरही त्यात सुधारणा हाेत नाही. यामागे राज्यातील सत्तेचा खेळ अाहे. अामचे एेकले जात नाही. अायुक्त राज्यकर्त्यांच्या दबावात काम करीत असल्याचा अाराेप केला.
१२ कर्मचाऱ्यांसाठी पत्र पाठवणार
९६ न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम करण्यास मंजुरी मिळाली. १२ कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अटीची समस्या हाेती. शासनाने त्यात शिथिलता दिल्याने नवीन अाकृतिबंधानुसार मंजुरी मिळावी यासाठी शासनाला पत्र पाठवणार असल्याचे अायुक्तांनी सांगितले.
पत्रांना उत्तरे दिली जात नाही हे खरे
अायुक्त डाॅ. गायकवाड यांनी अामदार असाे की महापाैरांनी दिलेल्या पत्रांना उत्तर दिली जात नाही हे खरे अाहे; परंतु काही वेळेला प्रशासनाला निर्णय घेताना वेळ लागत असताे. कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा लागताे. अामच्यावर काेणाचाही दबाव नाही. जनतेचे प्रश्न साेडवण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांना सूचना केल्याचे सांगितले. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क हाेऊ न शकल्याने राज्यकर्त्यांवर झालेल्या अाराेपांबाबत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.