आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणीची प्रक्रिया सुरू:आयआयएम कॅट ; बहुपर्यायी प्रश्नांनाच निगेटिव्ह मार्किंग, 14 सप्टेंबरपर्यंत नाेंदणीची मुदत

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसह इतर देशपातळीवरील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ‘कॅट’ (कॉमन अॅडमिशन टेस्ट) ही प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. त्याच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना १४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल.परीक्षेशी संबंधित फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन (एफएक्यू) जारी करण्यात आले आहेत; जेणेकरून त्याचा अभ्यास करून उमेदवारांना परीक्षा पॅटर्नची माहिती होऊ शकेल. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांची (मल्टी चॉइस) उत्तरे चुकली तरच निगेटिव्ह मार्किंग केली जाईल.

नॉन मल्टिपल चॉइस प्रश्नांची उत्तरे चुकली तर मात्र गुण कपात होणार नाही. परीक्षा केंद्रावर कॅल्क्युलेटर किंवा इतर गॅजेट नेण्यास बंदी आहे. पण कॉम्प्युटर स्क्रीनवरील कॅलक्युलेटरचा वापर करण्याची मुभा मात्र परीक्षार्थीला देण्यात आली आहे. विद्यार्थी मॉक टेस्टच्या माध्यमातून परीक्षा पॅटर्न, प्रश्नांचे स्वरूप समजून घेऊ शकतात. योग्य उत्तरे देणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला तीन मार्क, उत्तर चुकले तर वजा एक व प्रश्न न सोडवल्यास कोणतेही मार्क कापले जाणार नाहीत. ‘एफएक्यू’ चार प्रकारांत जारी केलेले आहेत.

ऑनलाइन अर्ज करतानाच विद्यार्थी आपल्या परीक्षेसाठी वेळेचे स्लॉट व परीक्षा केंद्राचे शहर नोंदवू शकतात. दरवर्षी सुमारे २ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. आतापर्यंतचा पॅटर्न पाहिला तर इंजिनिअरिंग पास विद्यार्थ्यांना या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर यश मिळालेले आहे.

निकाल जानेवारीत लागणार
‘कॅट’ची हॉलतिकिटे २७ ऑक्टोबर रोजी दिली जातील. तर २७ नोव्हेंबर रोजी परीक्षा होईल. जानेवारी महिन्यात निकाल जाहीर होतील. यातून वेगवेगळ्या आयआयएम जीडी व पीआयच्या आधारावर उमेदवारांचे प्रवेश होतील. त्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली जाणार आहे.

राज्यात १९ शहरांत परीक्षा केंद्रे
महाराष्ट्रात नागपुरात एकमेव आयआयएम संस्था आहे. कॅट परीक्षेसाठी राज्यातील १९ शहरांत परीक्षा केंद्रे आहेत. अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, भोईसर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पुणे, रायगड, सातारा, सोलापूर, ठाणे, वसई या शहरांत ‘कॅट’ परीक्षा देता येईल.

आयआयटी दिल्लीतही क्रेझ मॅनेजमेंट कोर्ससाठी पूर्वी आयआयएमला पसंती असायची. पण आता आयआयटी दिल्ली या संस्थेतील मॅनेजमेंट कोर्सला प्रवेश घेण्यासही पसंती दिली जाते. ही संस्था मॅनजमेंट कॅटेगिरीत एनआयआरएफ रॅकिंगमध्ये पहिल्या पाचमध्ये समाविष्ट झाली आहे. त्याचबरोबर आयआयएम अहमदाबाद, बंगळुरू व कोलकाता येथील संस्थेतही प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते.

बातम्या आणखी आहेत...