आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळूचा उपसा सुरू:महसूलच्या नाकावर टिच्चून गिरणा पात्रातून अवैध उपसा

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरानजीकच्या गिरणा नदीपात्रातून महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. काही ठिकाणी तर नदीपात्रात उतरण्यासाठी वाळूतस्करांनी चक्क जेसीबीने टेकड्या फाेडून रस्ते तयार केले आहेत. त्या मार्गावरून रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ट्रॅक्टर, डंपरच्या सहाय्याने वाळूची वाहतूक केली जाते आहे. निमखेडी, बांभाेरी या भागात तर पहाटे माॅर्निंग वाॅकसाठी जेव्हा लाेक फिरायला जातात तेव्हा महामार्गावर वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगा नजरेस पडतात.

नदीपात्रात जीव धाेक्यात घालून थेट पाण्यात ट्रॅक्टर उभे करून मजूर पाण्यात उतरून टाेपलीने वाळू काढून भरताना दिसतात. मात्र, वेळप्रसंगी हा प्रकार जीवघेणा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महसूल विभागाने वाळूतस्करी राेखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र, कारवाई हाेत नसल्याचे चित्र गेल्या दाेन आठवड्यांपासून समाेर येत असून लाेकभावना आता तीव्र हाेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...