आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडित:त्वरित वीज पुरवठा खंडित; अयोध्यानगरात ट्रकमध्ये वीज तारा अडकून रस्त्यावर पडल्या

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीकडे जात असलेल्या ट्रकमध्ये गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अयोध्यानगरात वीज तारा अडकून रस्त्यावर पडल्या. त्यानंतर त्वरित वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रक चालकाला चोप देण्याचा प्रयत्न केला. एमआयडीसी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

भुसावळकडून मालवाहू ट्रक अयोध्यानगर मार्गे एमआयडीसीकडे जात होता. ट्रकमध्ये माल भरलेला असल्याने श्री स्वामी समर्थ केंद्रानजीक राम मंदिराजवळ वीज तारा या ट्रकमध्ये अडकल्या. ट्रक सुरुच असल्याने तारा तुटून रस्त्यावर पडल्या. वीज पुरवठा त्वरित खंडित झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

बातम्या आणखी आहेत...