आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जन:मेहरूण तलावात १४०० गणपतींचे विसर्जन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मेहरूण तलावावर रविवारी पाच दिवसांच्या १४००पेक्षा अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. तलावात खाेल पाण्यात कुणीही उतरू नये अशा सूचना प्रशासनाकडून केल्या जात हाेत्या. मूर्ती विसर्जनासाठी जीवरक्षक पथकही तैनात हाेते.यंदा सार्वजनिकसह घरगुती गणेशांची स्थापना मोठ्या संख्येने झाली आहे. त्यात रविवारी पाचव्या दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने निर्माल्य संकलनासाठी दाेन ट्रॅक्टरची व्यवस्था केली हाेती. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी चार तराफे तैनात होते. यात प्रशासनाची जीवरक्षक बोट, अग्निशमन वाहनासह पट्टीच्या पोहणाऱ्यांची टीम या पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या निमित्ताने तैनात होती.

शोध व बचाव पथकासोबत अग्निशमन गाडी, रबरी स्पीड बोट, लाइफ जॅकेट, रिंग या साहित्यासह महापालिकेचे अधिकारी बाळासाहेब चव्हाण, अग्निशमनचे शशिकांत बारी, नगरसेविका ज्योती चव्हाण उपस्थित होते.निर्माल्य संकलन : दिवसभरात तलावावर गणपती विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांना गणेश घाटावरील हुंडीत किंवा महापालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये निर्माल्य टाकण्यास सांगण्यात येत होते. भक्तांकडून केवळ मूर्ती घेऊन त्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते.

बातम्या आणखी आहेत...