आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन:मेहरूण तलावावर दीड दिवसाच्या १५०हून अधिक गणपतींचे विसर्जन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेहरूण तलावावर गुरुवारी दीड दिवसाच्या १५०हून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया या... पुढच्या वर्षी लवकर या..’चा गजर करण्यात आला.

परंपरेनुसार दीड दिवस पूर्ण होताच गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन मेहरुण तलावार करण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेहरूण तलावावर ९०हून अधिक तर सात वाजेपर्यंत दीडशेहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. तसेच काही घरगुती गणपतींचे टप, बादलीत पूजा व आरती करून दीड दिवसाच्या १००हून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मेहरुण तलावावर शोध व बचाव पथकासोबत अग्निशमन गाडी, रबरी स्पीड बोट, लाइफ जॅकेट, रिंग यासह महापालिकेचे अधिकारी बाळासाहेब चव्हाण, शशिकांत बारी आदी या ठिकाणी उपस्थित होते.

जीवरक्षक बोट तैनात
मेहरूण तलावात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस व १० दिवसांचे गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे महापालिकेने तलावावर दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गुरुवारी जीवरक्षक बोट तैनात ठेवली होती. त्यामुळे काही अघटित घडल्यास तत्पर मदत मिळण्यास बोटीचा उपयोग होणार आहे. या बोटीतून दीड दिवसाच्या काही गणपतींचेही विसर्जनही करण्यात आले. जीवरक्षक येथे तैनात हाेते.

बातम्या आणखी आहेत...