आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेन्नई-अहमदाबाद नवजीवन, लोकमान्य टिळक एक्सप्रेस, लश्कर एक्सप्रेस, काशी, ताप्तीगंगा, रिवा-एकतानगर एक्सप्रेससह भुसावळ-नंदुरबार एक्सप्रेस या सात गाड्या रविवारी उशिराने धावत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
काही प्रवाशांनी गेल्या काही दिवसांपासून या गाड्या नियमित लेट धावत असल्याची खंत व्यक्त केली. अनेक गाड्या दोन तासांपेक्षा अधिक वेळ उशिराने धावत असल्याने ज्यांना शक्य होते त्यांनी रेल्वे स्थानकातून काढता पाय घेतला. तर काहींनी रेल्वे प्रशासनाच्या नावे संताप व्यक्त करत गाडीची वाट पाहण्याला प्राधान्य दिले.
जळगाव स्थानकात अनेक गाड्या गेल्या काही दिवसांपासून उशिराने येत आहेत. गाड्या उशिराने येत असल्याने प्रवाशांना तासंनतास रेल्वे स्थानकात रेल्वे गाडीचा वाट पाहवी लागत आहे. यात भुसावळ येथून येणारी भुसावळ-नंदुरबार एक्सप्रेस गाडीचाही समावेश असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यात भर म्हणजे रविवारी देखील सात गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना स्थानकातून काढता पाय घेतला. तर काहींनी बसस्थानक गाठून एसटीने जाण्याचा पर्याय निवडला. गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
या गाड्या धावल्या लेट ...
गाडी क्रमांक १२६५६ चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस २ तास १५ मिनिटे, १२१६२ लोकमान्य टिळक एक्सप्रेस २ तास १५ मिनिटे, ०९०७८ भुसावळ-नंदुरबार एक्सप्रेस २ तास, २०९०६ रिवा-एकतानगर २ तास,१४३१४ बरेली-लोकमान्य टिळक एक्सप्रेस १ तास ५० मिनिटे, गाडी क्र. १५०१८ काशी एक्सप्रेस ही गाडी अर्धातास, तर गाडी क्र. १९०४६ ताप्ती गंगा एक्सप्रेस ही गाडी ४५ मिनिटे उशिराने धावत आहे. तर गाडी क्र. १९००३ खान्देश एक्सप्रेस ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
5 - 6 डिसेंबरला ब्लॉक
भुसावळ ते जळगावदरम्यान अत्यावश्यक कामांसाठी रेल्वे प्रशासनाने 5 व 6 डिसेंबरला ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे 34 गाड्या रद्द केल्याची घोषणा आधीच करण्यात आली आहे. तसेच या ब्लॉकमुळे अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.