आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरतीबाबत महत्त्वाची बातमी:550 हामेगार्डस् पोलिस भरतीला जाणार सामोरे; सर्वांनाच 5% आरक्षणाचा फायदा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेलिसांच्या खांद्याला खांदा लावून अहाेरात्र काम करणाऱ्या होमगार्डसाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. यासाठी होमगार्डमध्ये भरती होऊन तीन वर्षे पुर्ण केल्याची अट आहे. या अटीनुसार जिल्ह्यातील सर्वच उमेदवार आरक्षणासाठी पात्र ठरले आहेत. यंदाच्या मेगा भरतीत जिल्ह्यातील सुमारे 550 उमेदवार भरतीला समोरे जाणार आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सन 2016-17मध्ये होमगाड भरती झाली आहे. म्हणजेच त्यावेळी भरती झालेल्या सर्व उमेदवारांना पाच वर्षांचा अनुभव आहे. प्रमाणपत्र देखील मिळालेले आहे. परंतु, राज्यातील काही शहरांमध्ये 1 डिसेंबर 2019 रोजी गृहरक्षक दलात 2500 होमगार्ड जवान भरती झाले होते. त्यांची 30 नोव्हेंबर 2022 रोजी सेवेतील 3 वर्षे झाली. या होमगार्डसला प्रमाणपत्रही त्याच दिवशी प्राप्त झाले. त्यामुळे या होमगार्डसमध्ये हर्षाचे वातावरण होते. परंतु, पोलिस भरतीच्या जाहिरातीत नंतर या गार्डसला प्रमाणपत्र मिळाले आहे. म्हणजे भरतीची जाहिरात 10 नोव्हेंबरला आली अन् या गार्डसला 30 नोव्हेंबरला प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे होमगार्डसाठी राखीव असलेल्या पाच टक्के जागांसाठीचा आरक्षणाचा काॅलमच उघडत नाही. परिणामी या 2500 होमगार्ड शासनाविरोधात बंडाच्या तयारीत आहेत. केवळ दहा दिवसांच्या अंतरामुळे त्यांना पाच टक्के आरक्षण मिळणार नसल्याचे सध्या दिसून येते आहे. पुढील भरतीपर्यंत अनेकांची वयोमर्यादा संपुष्टात येऊ शकते. त्यांना ही अखेरीची संधी असल्याने त्यांनी शासनाकडे आरक्षणासाठी विनंती केली आहे.

एकाच जिल्ह्यात संधी असल्याने असंतोष

राज्यातील सर्वाम मोठ्या म्हणजेच 18,000 पदांसाठी पोलिस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील 7 हजार जागा मुंबई आयुक्तालयांतर्गत आहेत. परंतु, या भरतीत एका उमेदवाराला कवेळ एकाच जिल्ह्यात भरतीला सामोरे जण्याची संधी देण्याची अट राज्य शासनाने घातली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये असंतोष उफाळुन आला आहे. या संदर्भात जिल्ह्यातील तरुणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

आत्तापर्यंत 175 होमगार्ड झाले पोलिस

सन 2007 पासून होमगार्डला पोलिस भरतीत पाच टक्के आरक्षण दिले जाते. तेंव्हापासून जिल्ह्यातील उमेदवारांचा भरतीकडे कौल वाढला आहे. जिल्ह्यात गत 15 वर्षात 175 होमगार्डस् पोलिस झाले आहेत. अशी माहिती गृहरक्षक दलाचे सहाय्यक जिल्हा समादेशक संजय पाटील यांनी दिली

बातम्या आणखी आहेत...