आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पंचायत राज व्यवस्थेत ग्रा.पं.चे महत्त्वपूर्ण स्थान

पाळधी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. ग्रामपंचायतीच्या विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची असून, ग्रामपंचायत ही विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. या ठिकाणी येणाऱ्या जनतेला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवून अधिक विकासात्मक कामे करावी असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पोखरी तांडा येथे येथे ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम, गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे व रस्ता काँक्रिटीकरण, जिल्हा परिषदेच्या शाळा खोली इमारत बांधकाम, अंगणवाडी इमारत बांधकाम अशा विविध विकास कामांचे लोकार्पण पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात अाले. या वेळी त्यांनी रस्त्याचे डांबरीकरण, नव्याने अंगणवाडी, ग्रामपंचायत समोरील चौक येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे व सुशोभिकरण करणे आदी कामांना मंजुरी देऊन गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करणार असल्याचे घोषित केली.

त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी हायवे ते पोखरी डांबरीकरण, पाळधी बस स्टँड ते पोखरी तांडा फाटा डांबरीकरण, स्मशानभूमी बांधकाम आदी कामानाही मंजुरी मिळाली असून, लवकरच कामे सुरुवात होणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, उद्योगपती दिलीप पाटील, माजी पं. स. सभापती अनिल पाटील, सरपंच गोकुळ शिंदे, उपसरपंच नवल पारधी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक उपशिक्षक नाना पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...