आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय बाजार:तेलबियांची आवक पुन्हा वाढली, तेल 14 रु. स्वस्त

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड ते दोन महिन्यांपासून तेलाच्या दरात माेठी वाढ झाली होती. मंगळवारी उघडलेल्या बाजारात सोयाबीन तेलाचे ९०० एमएलचे पाऊच १४ रुपयांनी स्वस्त झाले. तर १५ किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर अडीचशे रुपयांनी खाली आले. हे दर कमी हाेण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील पाम तेलाच्या दरातील घसरणीसोबत स्थानिक पातळीवर सर्वच तेलबियांची आवक वाढल्याचा परिणाम असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

तेलाचे भाव कमी झाल्याने प्रत्येक महिन्याच्या किचन बजेटमध्ये किमान ६० ते ७० रुपयांची बचत होणार आहे. गेल्या दीड महिन्यात हे बजेट किमान शंभर, दीडशे रुपयांनी वाढले होते. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत सोयाबीन तेल प्रति पाऊचचे दर १४२ रुपयांवर पाेहाेचले हाेते. मात्र हेच भाव मंगळवारी १२७ रुपयांवर आले.

संयुक्त कुटुंबाला जास्त प्रमाणावर लागणाऱ्या तेलाची गरज भागवण्यासाठी पंधरा किलोचा डबा घेतला जातो. या डब्याचे दर गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत २४०० रुपयांपर्यंत गेले होते. ते मंगळवारी २५० रुपयांनी कमी होऊन २,१५० रुपयांपर्यंत खाली आले. सर्वच खाद्यतेलात काही प्रमाणात पामतेल समाविष्ट केले जाते. त्याचे दर कमी अधिक झाले की सर्वच तेलांच्या दरामध्ये चढ-उतार होतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पामतेलाचे दर घसरल्याने देशातील घाऊक बाजारपेठेत गेल्या आठवड्यात ११० रुपये प्रति किलो मिळणारे पामतेल सोमवारी ९८ रुपयांपर्यंत खाली आले. त्याचा परिणाम मंगळवारी सोयाबीन तेलाचे दर घसरण्यावर झाला,

बातम्या आणखी आहेत...