आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना मल्टिटास्किंग असणे आवश्यक आहे. फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन काही उपयोग नाही तर त्यासोबतच वेगवगेळ्या कला देखील विद्यार्थ्यांना येणे आवश्यक आहे. याकरिता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वायत्त संस्थेतंर्गत वेगवेगळे विषय तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शैक्षणिक वर्षांपासून सांस्कृतिक, तांत्रिक, क्रीडा आदी प्रकार अंतर्भूत केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान देखील अवगत होईल सोबतच त्याचे क्रेडिट गुण देखील मिळतील.
या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू, केस स्टडीज ऑफ रुरल, व्हिलेज, ग्रामीण पाणी पुरवठा आदी अधिकचे अभ्यासक्रम घेऊन क्रेडिट विद्यार्थ्यांना वाढविता येणार आहे. क्रीडा अंतर्गत सर्व प्रकारच्या खेळ अंतर्गत असून विद्यार्थ्यांना संस्थास्तरावरील, विद्यापीठ स्तरावर किंवा राज्य, देश पातळीवर खेळात सहभाग घेतल्यानंतर १ ते ३ पर्यंत ऑडिट पॉईंट्स मिळविता येतात. सांस्कृतिक कार्यक्रमात देखील वेगवेगळ्या पातळीनुसार सहभाग नोंदविल्यास १ ते ४ पर्यंत ऑडिट पॉईंट्स घेता येतात. प्रत्येक विद्यार्थ्याला पदवी अर्थात बीटेक पूर्ण करण्याकरिता क्रीडा व सांस्कृतिक प्रकार मिळून १२ ऑडिट पॉईंट्स पूर्ण करणे आवश्यक आहे.
---
तांत्रिक विभागालाही लागणार १२ पॉईंट्स
तांत्रिक भागामध्ये पेपर प्रेझेंटेशन प्रोजेक्ट स्पर्धा सहभाग, तांत्रिक कोर्स (अभ्यासक्रमा व्यतिरिक्त), वर्कशॉप सहभाग, पेपर विद्यापीठ/राज्य/आंतरराज्य किंवा जागतिक स्तरावर प्रकाशित करणे, सॉफ्टवेअर बनविणे, फॉरेन भाषा शिकणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना याकरिता देखील १२ ऑडिट पॉईंट्स आवश्यक आहे. असल्याचे शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. जी.एम. माळवटकर यांनी सांगितले
--------------------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.