आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात घरे:भादलीत चोरट्यांनी सात घरे फोडली ; महिलेला पहाटे सहा जण फिरताना दिसले

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भादली येथे मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सात घरे फोडली. त्यात सहा लाख ३४ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर सकाळी ११ वाजता पोलिसांचा ताफा पोहोचला. यावेळी हातांच्या ठशांचे नमुने घेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हातात ग्लोव्हज नव्हते. एका कर्मचाऱ्याने घरातूनच लग्नपत्रिका उचलून त्याचा आधार घेत चोरट्यांनी हाताळलेले कपाटातील ड्रॉवर बाहेर तपासणीसाठी आणले. पोलिस दलाकडे अत्याधुनिक इन्व्हेस्टिगेशन किट असूनही घटनास्थळावर पुरावे गोळा करण्यासाठी जाणारे कर्मचारी हलगर्जीपणा करीत पुराव्यांशीच हेळसांड करीत असल्याचे यातून दिसून आले. भादली येथील मस्जीद चौकातील राजेंद्र रमेश चौधरी, दीपक जनार्दन चौधरी व तुळशीदास श्रावण चौधरी यांच्या घरी चोरी झाली. राजेंद्र चौधरी हे जळगावात मुक्कामी आले होते. तर दीपक चौधरी यांच्या कुटुंबातील सदस्याचा अपघात झाल्यामुळे ते नाशिक येथे गेले होते. राजेंद्र यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोकड लंपास झाली. याच घरांच्या मागे असलेल्या रडेवाड्यात रामचंद्र बाबूराव रडे, चिंधू वामन रडे, योगेश हेमचंद्र झांबरे व काशिनाथ सखाराम रडे यांची घरे फोडली आहेत. रामचंद्र रडे यांच्या जुन्या घरातून १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १ लाख ६८ हजार रुपयांची रोकड लांबवली. योगेश झांबरे यांचे श्रीराम अॅग्रो ट्रेडर्स हे दुकान फोडले. सुदैवाने झांबरे यांनी दुकानात रोकड ठेवलेली नव्हती. त्यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. पोलिस पाटील राधिका ढाके यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार सकाळी ११ वाजता सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र साळुंखे हे पथकासह पोहोचले. दरम्यान, गावातील एक महिला पहाटे ४ वाजता चार तरुण गावातून बाहेर पडताना दिसले. त्यानंतर आणखी दोन जण बॅग लावून पळत गेल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली.

बातम्या आणखी आहेत...