आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाधित:कोरोनाचे दोन्ही नवीन बाधित चोपड्यामधील ; सध्या जळगाव जिल्ह्यात सहा सक्रिय रुग्ण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, पुणे पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण आढळून आले. शनिवारी दिवसभरात दोन रुग्ण आढळले असून दोन्ही रुग्ण चोपडा तालुक्यातील आहेत. शुक्रवारी चोपडा तालुक्यात रुग्ण आढळले होते. एकाच कुटुंबातील हे रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात सहा सक्रिय रुग्ण असून त्यात जळगाव शहरात १, चोपडा ४ तर इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. शनिवारी ७१ रुग्णांच्या तपासण्या झाल्या. सक्रिय सर्व रुग्ण लक्षणे नसलेले असून होम क्वारंटाइन आहेत. चाैथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी आढावा बैठक घेतली. त्यात लॅब प्रमुख डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते. कोविडचे रुग्ण वाढल्यास त्यावर काय उपाययोजना करण्यात येतील, ऑक्सिजनसह बेड व इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आढावा घेण्यात आला. नवीन विषाणू तपासणी लॅबमध्ये उपलब्ध असलेल्या मशिन, तपासणी किट याबाबत त्यांनी माहिती घेतली. सोमवारी याबाबत पुन्हा सर्व डॉक्टरांसमवेत बैठक हाेण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...