आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • In Chopda Retired Army Jawan Beaten By Police Inspector | Severe Ear Injury | Treated At The Upazila Hospital | Demanding Suspension Of Chavan

निवृत्त आर्मी जवानाला पोलिस निरीक्षकाकडून मारहाण:कानाला जबर दुखापत; उपजिल्हा रुग्णालयात घेत आहे उपचार, निलंबनाची मागणी

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील घुमावल येथील रहिवासी सेवानिवृत्त आर्मी जवान पंकज दिलीप पाटील यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. पंकज पाटील हे सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

शारदानगर भागात राहत असलेले सेवानिवृत्त आर्मी जवान पंकज पाटील यांना 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही मारहाण झाली. आजी-माजी सेवाभावी संस्थेच्या सर्व जवानांनी यास विरोध केला आहे.

अशी झाली घटना

2 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास पंकज दिलीप पाटील हे आपल्या मुलाला घेऊन बाजारासाठी गेले होते. तहसील कचेरीच्या खाली चावळी जवळ फुलहार घेत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या पंकज पाटील यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी रस्त्यावर थांबून अरेरावी व दमदाटी केली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेत पुन्हा मारहाण करण्यात आली.

मुलगा रडत होता

यावेळी त्यांचा लहान मुलगा तहसील कार्यालय जवळ रडत होता. आणि पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण पोलीस ठाण्यात मारहाण करत होते. यावेळी त्यांनी 8 ते 10 वेळा कानशिलात लगावली. त्यामुळे त्यांच्या कानात दुखत असल्यामुळे त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. गेले 2 दिवस ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

निलंबनाची कारवाई करा

चोपडा तालुक्यातील आजी-माजी सेवाभावी संस्थेच्या सर्व जवानांनी चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांना निवेदन देऊन पोलिस अवतारसिंग चव्हाण यांच्या निलंबनाची कारवाईची मागणी केली आहे. सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने अध्यक्ष कैलास जगताप, उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, सचिव संदीप बडगुजर, कोषाध्यक्ष सुभाष शिरसाट, संग्राम कोळी, वीर पत्नी कविता कदम यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

रक्षा खडसेंची भेट

या प्रकरणी खासदार रक्षा खडसे, आमदार लता सोनवणे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांचे जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत आमची संघटना आंदोलन करत राहील अशा इशारा आजी माजी सेवानिवृत्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...