आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम‎:उद्योजकता कार्यशाळेमध्ये महिलांनी‎ गिरवले मसाले, मुखवास निर्मितीचे धडे‎

जळगाव‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांनी सुरू केलेल्या उद्योगांना‎ चालना मिळावी यासाठी हिरकणी‎ महिला मंचने एक पाऊल पुढे उचलले‎ आहे. त्यासाठी महिला उद्योजकता‎ कार्यशाळेचे आयोजन केल्याचे‎ डॉ.वंदना वाघचौरे यांनी सांगितले.‎ महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, आर्या‎ फाउंडेशन संचलित भुसावळ हिरकणी‎ महिला मंचातर्फे १० ते १२ मार्चदरम्यान‎ महिला उद्योजकता कार्यशाळा घेतली.‎ त्यात महिलांना केक बनवणे, मसाले व‎ मुखवास निर्मितीचे प्रशिक्षण दिले.‎ प्रतीक्षा महिला मंडळाच्या अध्यक्षा‎ रजनी सावकारे अध्यक्षस्थानी, तर आर्या‎ फाउंडेशनच्या संचालिका डॉ.वंदना‎ वाकचौरे, युनियन बँक व्यवस्थापक‎‎‎‎‎‎‎ सुषमा कांबळे, देणाली फुड्सच्या‎ अध्यक्षा दीपाली सुरवाडे, प्रशिक्षक‎ चेतना पाटील प्रमुख पाहुणे होते. छत्रपती‎ शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व‎ पोवाडा गायनाने कार्यशाळेचे उद्घाटन‎ झाले.

रजनी सावकारे यांनी ऑनलाइन‎ शॉपिंग टाळून उद्योग-व्यवसाय‎ करणाऱ्या आपल्या मैत्रिणींकडून खरेदी‎ करावी. यामुळे पैसा आपल्यातच फिरत‎ राहील, असे सांगितले. दीपाली सुरवाडे‎ यांनी उद्योग-व्यवसायातील अडचणींवर‎ कशी मात करावी हे समजवून सांगितले.‎‎‎‎‎‎‎ कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी हिरकणी‎ महिला मंचच्या सर्व सदस्या कल्पना‎ सोनवणे, मनीषा बराटे, वैशाली कोळी,‎ अश्विनी कासार, प्रजावती तायडे,‎ ऐश्वर्या सुरवाडे, सारिका बाविस्कर,‎ ज्योती घारू, सुनीता बागुल, मीनल‎ भालेराव, सायली साबळे, रीना पारधे,‎ प्रियंका लोणारी यांनी सहकार्य केले.‎ सूत्रसंचालन संगीता बोलके, तर आभार‎ आशा पाटील यांनी मानले. उपक्रमाला‎ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे‎ आयोजकांनी सांगितले.‎

असे दिले प्रशिक्षण
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी चेतना पाटील यांनी‎ महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे व चवीचे केक कसे तयार करावे? याचे प्रशिक्षण‎ दिले. दुसऱ्या दिवशी नागाई मसाला एजन्सीचे संचालक ज्योती सिंगते व चारुदत्त‎ पिंगळे यांनी मसाला व मुखवास बनवण्याचे प्रशिक्षण दिले. तिसऱ्या दिवशी सर्व‎ प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले असे आयोजकांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...