आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोसायटी अध्यक्ष:पाच वर्षांत १० जणांना मिळणार स्वीकृत संचालक पदासाठी संधी

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग. स. सोसायटी अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर स्वीकृत संचालक निवडीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी सहकार गटाकडून राम पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर उर्वरीत एका जागेसाठी जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील शिक्षकाला संधी दिली जाणार आहे. कार्यकारी मंडळाच्या पहिल्याच बैठकीत तज्ञ संचालकांच्या नावाची घोषणा होईल. दरवर्षी दोन असे पाच वर्षांत १० जणांना संधी दिली जाणार आहे. जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी पतपेढीच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदाची निवडणूक गाजली. सत्ता काबीज करण्यावरून प्रचंड गोंधळ उडाला. त्रिशंकू परिस्थितीत लोकसहकारच्या दोन संचालकांना सोबत घेवून सहकार गटाने विजय संपादन केला. त्यामुळे ग.स. सोसायटीतील स्वीकृत संचालकही सहकार गटाच्या मर्जीतील राहणार हे स्पष्ट आहे. पहिल्याच वर्षी सहकार गटाकडून स्वीकृत संचालकांच्या दोन जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले राम पवार यांच्या नावाची घोषणा अध्यक्ष उदय पाटील यांनी केली. गुरुवारी झालेल्या गोंधळ व वादादरम्यान पवार यांनी सहकार गटाच्या संचालकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली होती. तर उर्वरीत एका जागेवर जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील शिक्षकाला संधी दिली जाणार आहे. तीन ते चार नावांवर चर्चा सुरू असून आठवडाभरात होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सहकार गटाकडून निर्णय होणार आहे. वर्षभरासाठी असेल निवड : स्वीकृत अर्थात तज्ञ संचालकांची वर्षभरासाठी निवड हाेणार अाहे. पाच वर्षात दहा जणांना संधी दिली जाईल. त्यात संस्थेचा सभासद असलेल्या व सामाजिक व सहकार क्षेत्रात कामाची अावड असलेल्या समर्थकांना संधी दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...