आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफाेडी:गणेश काॅलनीत दिवसा दाेन लाखांची घरफाेडी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण कुटुंब लग्नासाठी बाहेर गावी गेल्याची संधी साधून अर्पाटमेंटच्या सहा फ्लॅटमध्ये रहिवासी असताना भरदिवसा बंद फ्लॅटचे कुलूप कापून चाेरटे घरात शिरले. त्यांनी ७० हजारांच्या राेकडसह २ लाख नऊ हजारांचा एेवज लांबवला. शहरातील गणेश काॅलनीत ही घटना घडली. जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात घरफाेडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भरदिवसा ही घरफाेडी झाल्याने परिसरातील नागरिक प्रचंड धास्तावलेले आहेत. गणेश काॅलनीतील शिवसागर अपार्टमेंटमध्ये फ्लॅट क्रमांक पाचमध्ये व्यावसायिक तन्मय पद्माकर पिले (वय ५२) हे पत्नी, आई, व मुलगा यांच्यासह रहिवास करतात. या अर्पाटमेंटमध्ये सात फ्लॅट आहेत. त्यापैकी एक फ्लॅट बंद असून, उर्वरित सहा फ्लॅटमध्ये रहिवासी आहेत. तन्मय पिले यांच्या आतेभावाच्या मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण कुटुंबीय २ डिसेंबर राेजी पहाटे पाच वाजता नाशिक येथे गेले हाेते. त्यांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समाेर राहणारे निवृत्त प्रा. अविनाश झाेपे यांनी फाेन करून घरफाेडी झाल्याची माहिती दिली. पिले यांनी लगेच पाेलिसांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...