आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंक्रांतीचा सण ताेंडावर आहे. पतंग उडवण्यासाठी नायलाॅन मांजाला बंदी आहे. मात्र, असे असले तरी हरिविठ्ठलनगरात बसथांबा परिसरात एक तरुण घराबाहेर ओळखीच्या मुलास उभार करून नायलाॅन मांजा विक्री करताे आहे. सरासरी १०० ते ५०० रुपयांपर्यंत त्याच्याकडे मांजा मिळत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने बुधवारी दुपारी १ वाजता केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समाेर आले. नायलॉन मांजामुळे पशुपक्षी, नागरीक जखमी हाेतात तर काहींनी जीव गमवावा लागताे. हा धाेका ओळखून न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. त्या अनुषंगाने महापालिका, पोलिस प्रशासन हा मांजा विक्रेत्यांवर नजर ठेऊन आहेत. तरी देखील छुप्या पद्धतीने मांजा विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. हरीविठ्ठलनगरात एक तरुण घराबाहेर ओळखीच्या मुलास उभा करुन ग्राहकांना नायलॉन मांजा विक्री करीत आहे. कोणाच्या लक्षात येऊ नये, पकडले जाऊ नये म्हणून केवळ ओळखीच्या लोकांनाच ताे मांजा विकला जातो आहे. सरासरी १०० ते ५०० रुपयांपर्यंत हा मांजा उपलब्ध केला जाताे. बाहेर उभा असलेला तरुण मात्र लक्ष ठेऊन असतो.
ढाकेवाडी भागात गाेदामात साठा शहरातील जाेशीपेठेत ३ जानेवारी रोजी महापालिका प्रशासनाने कारवाई केली. त्यानंतर ४ जानेवारी रोजी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने या भागात जाऊन विक्रेत्यांना नायलॉन मांजाची मागणी केली. या वेळी दुकानात फक्त कॉटनचा मांजा आहे; पण गोदामातून नायलॉनचा मांजा उपलब्ध होऊ शकतो असे उत्तर एका विक्रेत्याने दिले आहे. या विक्रेत्याचे गोदाम ढाकेवाडी परिसरात असल्याचे समोर आले आहे. तर सिंधी कॉलनीतील एका विक्रेत्याने नायलॉन मांजा विक्रीस ठेवलेला नसल्याचे सांगितले.
वरणगावातून जळगावात पुरवठा : मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातून रेल्वेने येणाऱ्या नायलॉन मांजाचा साठा भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील एका मोठ्या विक्रेत्याने करून ठेवला आहे. वरणागाव परिसरातच मोठ्या गोदामात हा मांजा ठेवलेला आहे. तेथून जिल्हाभरात पुरवठा केला जातो आहे. मध्यस्थ व ओळखीच्या विक्रेत्यांना रात्रीच्या वेळी त्याच्याकडून मालाचा पुरवठा केला जाताे, असे साखळीत सहभागी असलेल्या विक्रेत्यांकडून खासगीत बाेलताना सांगण्यात येते आहे. दोघे जण नायलाॅन मांजाने जखमी शहरात नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे आणखी दोन उदाहरणे समोर आले आहेत. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य हेमराज सपकाळे हे ३ जानेवारी रोजी सायंकाळी इच्छादेवी चौकातून दुचाकीने जात असताना त्यांच्या गळ्यावरुन नायलॉन मांजा घासला गेला. सुदैवाने सपकाळे यांनी थंडीसाठी रुमाल बांधलेला असल्याने अप्रिय घटना टळली. दुसऱ्या एका घटनेत हरीविठ्ठल नगरातील एका अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावरही मांजा घासला गेल्याने तो किरकोळ जखमी झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.