आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तक‎:वाढदिवसानिमित्त हा उपक्रम‎ राबवण्यात; मनसेने 10 विद्यार्थ्यांना घेतले दत्तक‎

यावल‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेनेने मंगळवारी १० गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक‎ घेतले. गट साधन केंद्रात झालेल्या कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना ‎मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मनसेचे‎ अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम‎ राबवण्यात आला.‎

मनसेचे जिल्हाध्यक्ष कमल‎ घारू, जिल्हा उपाध्यक्ष संजय‎ नन्नवरे, तालुकाध्यक्ष जुगल पाटील,‎ शहराध्यक्ष आकाश चोपडे,‎ गटशिक्षण अधिकारी नइमोद्दीन‎ शेख, शिक्षण विस्तार अधिकारी‎ विश्वनाथ धनके, केंद्र प्रमुख प्रमोद‎ सोनार, विजय ठाकूर, किशोर‎ चौधरी, पवन कोळी, सुमित घारू,‎ जय सुरवाडे, नरेंद्र बारी, कुणाल‎ गजरे, अमोल बिऱ्हाडे, जतीन‎ घारू, विकी बाविस्कर, मिलिंद‎ कोळी, चेतन सपकाळे, विकी‎ नारेकर उपस्थित होते. यानंतर पक्ष‎ प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त‎ वृक्षारोपण करण्यात आले. शहरात‎ विविध भागात लावलेल्या या‎ रोपांच्या संगोपनाची जबाबदारी‎ पदाधिकाऱ्यांनी घेतली. जनहित‎ जिल्हा संघटक चेतन अढळकर,‎ उपजिल्हा संघटक अजय तायडे,‎ तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे,‎ उपाध्यक्ष शाम पवार, गौरव कोळी,‎ नितीन डांबरे, चेतन सपकाळे,‎ हरीश बारी उपस्थित होते.‎ शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी कमल घारू, संजय नन्नवरे व सहकारी.‎

बातम्या आणखी आहेत...