आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात व्यापाऱ्याची फसवणूक:मशीन खरेदीच्या नावाने घातला साडेचार लाखांना गंडा, शनिपेठ ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पेंट विक्री करणारे व्यापारी यांनी बादल्यांमध्ये रंग भरण्यासाठी लागणारे मशीन खरेदीसाठी उद्योजकाला 4 लाख 23 हजार 850 अ‍ॅडव्हान्स दिला होता. या उद्योजकाने मशीन न पाठवता फसवणूक केली. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, हमीद युसुफ मेमन (वय 40, रा. कासमवाडी) यांची फसवणूक झाली आहे. मेमन कुटुंबी रंग विक्रीचा व्यापार करतात. व्यापार वृद्धीसाठी त्यांना विविध आकराच्या बादल्यांमध्ये ऑटोमॅटीक पद्धतीने रंग भरण्यासाठी मशीन खरेदी करायची होती. यात वेळ व पैशांची बचत करण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी त्यांना आठवडे बाजार परिसरात मुकेश मिस्त्री हा भेटला. मुकेशचा अहमदाबाद येथे अंबिका इंजिनिअर्स नावाने मशीन तयार करण्याचा कारखाना आहे.

मेमन यांनी मुकेशच्या कारखान्यातून टोमेटीक लोड सेल बेस फाइव्ह हेड लिक्वीड फिलींग मशीन खरेदी करायचे ठरवले. व्यवहारासाठी 35 टक्के म्हणजेच 4 लाख 23 हजार 850 रुपये अ‍ॅडव्हान्स मुकेशच्या बँक खात्यात जमा केला. यानंतर काही दिवसात मशीन मिळणे अपेक्षीत होते. परंतु, मुकेश याने मशीन पाठवले नाही. फोनवर उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर मेमन यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुकेशच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...