आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबौद्ध साहित्य परिषदेतर्फे तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगावातील लेवा भवनात २ व ३ एप्रिल असे दाेन दिवस हाेणार आहे. तयारीसाठी नियुक्त केलेल्या समित्यांची आढावा बैठक महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी घेतली. लाेकसहभाग कसा वाढेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. स्वागत समिती, प्रचार व प्रसार समिती, कार्यक्रम संचलन समिती, ग्रंथ प्रदर्शन समिती, भोजन समिती, निवास व्यवस्था समिती, धम्मग्रंथ समता दिंडी संयोजन समिती अशा महत्त्वपूर्ण समित्यांनी आढावा सादर केला. त्यात जवळपास हजार प्रतिनिधींची संमेलनाला उपस्थिती राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
बौद्ध साहित्य संमेलनाचे शहराचे अध्यक्ष बाबुराव वाघ यांनी या बैठकीपुर्वी प्रास्ताविकेतून संमेलनाची रूपरेषा सांगितली. ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी संमेलनाची भूमिका मांडून संमेलन यशस्वी होण्यासाठी कृती कार्यक्रमाची चर्चा केली. हरिश्चंद्र सोनवणे यांनी संमेलनाच्या निवास व्यवस्थेच्या संदर्भात मत मांडले प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनीही विचार मांडले.
बैठकीला मिलिंद केदार, संतोष गायकवाड, वाल्मीक सपकाळे, मिलिंद तायडे, महेंद्र केदारे, आनंदा तायडे, यशवंत घोडेस्वार, दिलीप सोनवणे, गौतम सपकाळे भिवसन अडकमोल, बापूराव पाटील, प्रा. प्रितीलाल पवार, भारत सोनवणे, सुनील सोनवणे, समाधान सोनवणे, राजेश पाटोळे, प्रकाश दाभाडे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, चंद्रमणी सोनवणे उपस्थित होते. बैठकीचे आभार उदय सपकाळे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.