आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात घरबांधकामाच्या नावाने बँकेला गंडा:महिलेकडून कॅनेरा बँकेची तब्बल 10 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव तालुक्यातील एका बँकेला गहान खरेदीखत देवून घर बांधकाम करायचे सांगून वेळोवेळी बँकेकडून पैसे घेत 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात बुधवारी चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात असे की, शहरातील कॅनेरा बँकेत घर बाधण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून अनिता खुशाल माळी (रा. मौजे सिताणे, ता. जि. धुळे) यांनी येथील ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 21 क्षेत्र 77 बाय 20 = 1540 चौरस फुट बखाळ जागा या ठिकाणी घर बांधवयाचे आहे, अशी विनंती कॅनेरा बँकेत केली. त्यानुसार कॅनेरा बँकेतून दहा लाख रुपये पैकी बँकेकडुन एकून 9 लाख 67 हजार 846 रुपये एवढे कर्ज घेतले.

परंतू दिनांक 27 फेब्रुवारी 2015 रोजी संशयित आरोपी यांनी बँकेला सदर मिळकतीवर दस्त क्रं. 1293/2015 अन्वये नोंदणीकृत रजिष्टर गहाण खत करुन देवुन तसेच वेळोवेळी घर बांधकामाचे खोटे दस्त व फोटो बँकेत सादर करुन बँकेकडून कर्ज घेत आजपावेतो सदर कर्जाची रक्कम व व्याज बँकेला परत न करता बँकेला करुन दिलेले गहाण खत दस्त क्रं. 1293/2015 प्रमाणे सदर ठिकाणी घराचे बांधकाम न करता बँकेची फसवणुक केली आहे. सात वर्षानंतर ही बाब बँकेच्या लक्षात आली.

या प्रकरणी तन्मयदास गोरगोपाल दास (धंदा नोकरी, रा.बँक रोड, विध्यावासानी नगर, गोरखपूर, ह.मु. मिलेनियम पार्क सोसायटी चिखलथाने, औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिता खुशाल माळी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस हे करीत आहेत.

दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर कॅनरा बँकेच्या चाळीसगाव शाखेत खळबळ उडाली आहे. गेल्या सात-आठ वर्षात दिल्या गेलेल्या कर्जांची तपासणी या निमित्ताने करण्यात येते आहे. तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा या फसवणूकीत समावेश आहे का? याचीही चौकशी करण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...