आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक:जळगाव जिल्ह्यात दोन जणांना 28 लाखांचा गंडा; त्या ठगावर आणखी दोन गुन्हे दाखल

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथे राहणाऱ्या भुषण शरद पाटील याने तालुक्यातील अनेक तरुणांना सरकारी नोकरीस लावून देण्याचे आमीष देत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत. गेल्या आठवड्यात एका तरुणाने गुन्हा दाखल केला होता. यानंतर मंगळवारी भुषणच्या विरुद्ध पुन्हा दाेन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात दोन तरुणांची तब्बल 28 लाख रुपयांत फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यातील एक पानटपरी चालक असून त्याच्यासह अनेकांनी देखील नोकरीसाठी 24 लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कैलास अशोक पाटील (वय 41, रा. तारखेडा, ता. पाचोरा) हे पानटपरीचालक आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 7 जानेवारी 2020 रोजी भुषण पाटील याने त्यांना संपर्क केला. रल्वेत गँगमन, टीसी, म्हाडा, फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये शिपाई पदावर नोकरी लावून देतो, असे आमीष भुषणने दिले. त्यापोटी पत्येकी 10 लाख रुपये लागतील असे त्याने सांगीतले होते. भुषणच्या आमीषांना बळी पडल्याने कैलास पाटील यांच्यासहह काही जणांनी मिळुन भुषणला २४ लाख 39 हजार 500 रुपये दिले. अडीच वर्ष उलटल्यानंतर देखील भुषणने नोकरीच्या संदर्भात काहीच कार्यवाही केली नाही. लोकांनी नोकरीसाठी तगादा लावल्याने भुषण बेपत्ता झाला होता. दरम्यान, गेल्या आठवड्यात भुषणच्या विरुद्ध अशाच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फसवणूक झालेले अनेक जण समोर आले. त्यानुसार आता गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

विधवा महिलेकडून घेतले 4 लाख

पाचोरा तालुक्यातील चिंचखेडा येथे राहणाऱ्या छायाबाई दिलीप पाटील (वय 52) यांच्याकडून देखील भुषणने चार हजार रुपये घेतले आहेत. छायाबाई यांचा मुलगा राहूलला नोकरी लावून देण्याचे आमीष त्याने दिले होते. 15 जानेवारी 2022 रोजी भुषणने चार लाख रूपये घेतले आहेत. याही प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा पोलिस भूषणचा शोध घेत आहेत. दरम्यान त्याने आणखी लोकांना फसवले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...