आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • In Jalgaon, Group Secretaries Will Finally Get Seven Months' Salary After The Strike; An Assurance Of Two Crore Rupees From The District Bank

जळगावात अखेर गटसचिवांचा संप मागे:सात महिन्याचा पगार मिळणार; जिल्हा बँकेकडून दोन कोटी रुपयांचे आश्वासन

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 11 ऑगस्टपासून संपावर असलेल्या गटसचिवांनी अखेर 30 ऑगस्टपासून आंदाेलन मागे घेतले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने यात महत्वाची भूमिका घेत सचिवांच्या थकीत पगारासाठी दाेन काेटी रूपये देण्याचे मान्य केले आहे. आता सचिवांच्या थकीत पगारापैकी सात महिन्यांचे वेतन अदा केले जाणार आहे. संप मागे घेतल्याने गटसचिव आजपासून कामावर रूजू झाले आहेत.

थकीत पगार मिळत नसल्याने जळगाव जिल्हा गटचिवांचा संप गेल्या 11 ऑगस्ट पासून सुरू हाेता. या संपामुळे जिल्हा बॅक, विविध कार्यकारी साेसायट्यांची कामे ठप्प झाली हाेती. राज्य शासनाने ऐन अधिवेशन काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राेत्साहन अनुदान देण्यासाठी स्थानिक पातळीवरून माहिती मागितली हाेती. परंतु गटसचिवांचा संप असल्याने ही माहिती सदर करतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. हे कामकाज मार्गी लावण्यासाठी गटसचिवांच्या संपाची दखल तातडीने घेण्यात आली. त्यानुसार आता 1 सप्टेंबर राेजी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बैठकीत दाेन काेटी रूपये गटसचिवांच्या वेतनासाठी देण्यास मान्यता देणार आहे. येत्या 5 सप्टेंबरपर्यंत गटसचिवांना थकीत 10 पैकी 7 महिन्याचे वेतन मिळेल.

उपनिबंधक आले पुढे.........

गटचिवांचा पगार थकल्याने सुरू असलेला संप मागे घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक संताेष बिडवाई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी गटसचिव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.त्यात बँकेने सचिवांच्या थकीत पगारापोटी दोन कोटी व जिल्हा केडरचे एक कोटी सचिवांच्या पगारासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गटसचिव संघटनेला लेखी आश्वासन दिल्यानंतर संघटनेकडून संप मागे घेण्याची घाेषणा करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे कृती समितीचे अध्यक्ष गुलाब पाटील, विजय पाटील, राहुल बोरसे, दिलीप चव्हाण, मनोज साळुंखे, भालचंद्र वाणी , गजानन निकम, अविनाश पाटील उपस्थित हाेते.

75 टक्के पगार मिळणार.......

जिल्हा बँक पगारासाठी जिल्हा केडरला 2 कोटी रूपये कर्ज देणार आहे. 30 ऑगस्ट रोजी हे पैसे केडरच्या खात्यावर वर्ग केले जातील. या पैशातून सचिवांचे 75 टक्के पगार 5 सप्टेंबरपूर्वी केले जाणार आहेत. ज्या सचिवांचे 10 महिन्याचे पगार थकीत आहेत त्यांचे 7 महिन्याचे पगार काढण्यात येतील.या निर्णयाला 1 सप्टेंबर राेजी हाेणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सभेत मान्यता घेतलीजाणार आहे. यासाठी सचिव त्या-त्या तालुक्यातील जिल्हा बँकेच्या संचालकांना भेटून ठराव मंजुर करण्याची विनंती करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...