आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्लास्टिकमुक्त शहर या संकल्पनेला चालना देण्यासाठी राज्यात विविध शहरात ‘प्लाॅगिंग माेहीम’ राबवली जाते आहे. जळगावातही ‘प्लाॅगर्स’ ग्रुपची स्थापना वर्षभरापूर्वी तीन तरुणांनी केली. आजमितीला सदस्यांचा हा आकडा दीडशेपेक्षा अधिक झाला आहे. त्यांनी वर्षभर दर रविवारी ही माेहीम राबवली. त्यात ५० सार्वजनिक ठिकाणे, चाैकांत पडलेला प्लास्टिक कचरा वेचला. त्यांच्या या कृतीचे अवलाेकन आता इतर लाेक करताहेत. ‘जळगाव प्लाॅगर्स’ या नावाने ग्रुप चेतना जैन, शुभम वाणी, प्रसाद पाटील या युवकांनी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी तयार केला. मेहरूण तलावावर सर्वप्रथम हे स्वच्छता अभियान राबवले. हळूहळू युवक-युवती या ग्रुपला जुळले. दर रविवारी न चुकता ठरलेल्या ठिकाणी ग्रुपचे सदस्य एकत्र येतात. जाते आहे. आजपर्यंत या ग्रुपने जळगाव शहराची आेळख असलेला मेहरूण तलाव, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, नेहरू पुतळा परिसर, शिवतीर्थ मैदान, आकाशवाणी चौक व गर्दीच्या ठिकाणी हे अभियान राबवले.
प्लाॅगिंग म्हणजे काय? : जाॅगिंग करताना परिसरात आढळणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करणे, तसेच या कचऱ्याला पुढील प्रक्रियेसाठी महापालिकेची यंत्रणा असेल तर त्यांच्याकडे देणे म्हणजेच प्लाॅगिंग हाेय. प्लास्टिक कचरा संकलनाच्या प्रक्रियेला ‘प्लाॅगिंग ड्राइव्ह’ म्हटले जाते.
नेतृत्वगुण विकसित हाेणार
अभियानासाठी दर रविवारी जागा निश्चित करणे, त्या संबंधीची माहिती सदस्यांना देणे यासाठीचे नेतृत्व प्रत्येक सदस्यांकडे दिले जाते. त्यांच्या या कार्याची व्याप्ती वाढत असल्याने विविध महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून त्यांना विविध अभियानात सहभागी करून घेतले जात आहे. वर्षभरात एकही रविवार या उपक्रमात खंड पडू दिला नसल्याचे या ग्रुपच्या सदस्यांकडून प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधताना सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.