आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील दहा ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जाहीर झाले. शिंदे गटाचे सहा, भाजपचे तीन सरपंच निवडून आले. तर राष्ट्रवादीनेही चार सरपंच आपले निवडून आल्याचा दावा केला आहे. सर्वाधिक २५६ मतांनी भोलाण्याचे सरपंचपदाचे उमेदवार नितीन कोळी तर सर्वात कमी सात मतांनी वसंतवाडीचे सरपंचपदाचे उमेदवार विनोद शिवाजी पाटील हे निवडून आले. कुवारखेड्यात प्रभाग क्रमांक तीनमध्ये सदस्यपदाच्या महिला उमेदवारांना प्रत्येकी ५५ मते मिळाली. ईश्वरचिठ्ठीने सगुणा पाटील विजयी झाल्या.
नूतन मराठा महाविद्यालयाच्या डीएड हॉलमध्ये दहा ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. सर्वात पहिला निकाल वसंतवाडी ग्रामपंचायतीचा जाहीर झाला. भादली खुर्दच्या सरपंचपदी दीपाली पाटील या विजयी होताच त्यांचे पती किशोर पाटील यांनी त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. सावखेडा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती जितंेद्र पाटील, सुजदेच्या सरपंचपदी सुनंदा सुनील सोनवणे या बिनविरोध निवडून आल्या.
वराड खुर्द, घार्डी-अमोदे, भादली खुर्द व देऊळवाडे या सहा ग्रामपंचायतींत महिला सरपंच झाल्या आहेत. भादली खुर्दच्या दीपाली पाटील यांनी बाजार समितीचे माजी सभापती भरत बोरसे यांच्या पत्नी आशा बाेरसे यांचा पराभव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.