आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वास थांबला:जळगावात पतंगाने घेतला दोन मुलांचा बळी, एकाने पतंग न मिळाल्याने घेतला गळफास

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संक्रांतीनिमित्त घराच्या छतावर पतंग उडवताना उच्च दाबाच्या वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढताना शाॅक लागून एका आठवर्षीय बालकाचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत बहिणीने पतंग दिला नाही म्हणून १२ वर्षीय भावाने झाेक्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. जळगावातील कांचननगरातील रमेश राजपूत यांचा मुलगा यश राजपूत (१२) हा शुक्रवारी संक्रांतीनिमित्त पतंग मागत हाेता. मात्र, त्याची तब्येत ठीक नसल्याने बहिणीने त्याला विराेध केला; परंतु तरीही ताे त्यासाठी हट्ट धरत हाेता. त्यानंतर बहिणीने त्याला घराच्या वरच्या मजल्यावर खाेलीत थांबायला सांगून बाहेरून दरवाजा लावून घेतला हाेता. मात्र, थाेड्या वेळानंतर ती दरवाजा उघडून आत गेली असता तिला भावाचा मृतदेह झाेक्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तिने आक्राेश केल्यानंतर शेजारी धावले. त्यांनी त्याला खाली उतरवून शासकीय रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले.

वीजतारांनी केला हितेशचा घात...
जळगाव शहरानजीकच्या कुसुंब्यातील गणपतीनगरात हितेश आेंकार पाटील (८) हा घराच्या छतावर पतंग उडवत हाेता. शेजारून गेलेल्या उच्च दाबाच्या वीजतारांमध्ये त्याचा पतंग अडकला. ताे काढण्यासाठी छतावर गेला असता वीजतारांना स्पर्श झाल्याने त्याला जाेरदार विजेचा धक्का लागला. त्यात ताे फेकला गेला. गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रस्त्यात त्याचा श्वास थांबला.

बातम्या आणखी आहेत...